Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात कलम 144 चे आदेश लागू....
उस्मानाबाद :- फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतुदीनुसार जिल्ह्यात कोरोना विषाणू (कोव्हीड 19 )चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जिल्ह्यातील सर्व सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक व क्रीडाविषयक कार्यक्रमांना दिनांक 21 मार्च 2020 पासून मनाई करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले आहेत.

     सद्यस्थितीत संपूर्ण देशात तसेच महाराष्ट्रात बहुतांश भागात करोना (कोव्हिड 19) या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण आढळून आले असून, करोना (कोव्हिड 19)   या संसर्गजन्य आजार असल्याने उस्मानाबाद जिल्ह्यात गर्दीच्या/ सार्वजनिक ठिकाणावरील कार्यक्रमाचे आयोजन केल्यास करोना (कोव्हिड 19)  विषाणूंचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होवू शकतो. करोना विषाणूचा फैलावा वाढु नये यासाठी व त्यास प्रतिबंध करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी एकत्र येण्यास तसेच सार्वजनिक ठिकाणच्या कार्यक्रमास प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. करोना (कोव्हिड 19)  विषाणूंचा प्रादुर्भाव ही एक राष्ट्रीय आपत्ती असल्याने, आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यातील सभागृहे, मंगल कार्यालय, बंद ठेवणेकामी तसेच धार्मिक कार्यक्रम (लग्नकार्य/विधी/रिेसेप्शन इत्यादी)  घरगुती पद्धतीने घरच्या घरी करण्यासाठी दहा किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र  जमण्यास मनाई करण्यासाठी  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 संपूर्ण जिल्ह्यात लागू करण्यात येत आहे.

      *फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतुदीनुसार  दि.21 मार्च 2020 रोजीपासून ते पुढील आदेश होईपर्यंत (सहा महिन्यांपेक्षा जास्त नाही इतक्या कालावधीसाठी) उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये खालील प्रमाणे आदेश आदेश लागू राहणार आहेत.

1) प्रशासनाच्या पूर्व परवानगी शिवाय कोणत्याही धार्मिक/ यात्रा/ मिळावे/ विविध प्रकारचे प्रदशने/ आठवडी बाजार/जनावरांचे बाजार भरविणे इत्यादीचे  आयोजन करण्यास मनाई करण्यात येत आहे. 2)उस्मानाबाद जिल्हयामधील खाजगी अथवा सार्वजनिक इत्यादी सर्व प्रकारची सभागृहे, मंगल कार्यालये, सभामंडपे चालू ठेवण्यास मनाई करण्यात येत आहे.( शासकीय बैठक, प्रशिक्षण कार्यक्रम वगळून).  3) कोणतीही धार्मिक कार्यक्रम (लग्नकार्ये/विधी/ रिसेप्शन इत्यादी)  घरगुती पद्धतीने घरच्या घरी करण्यासाठी दहा किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमण्यास मनाई करण्यात येत आहे. 4)उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व चित्रपटगृहे, फिरते चित्रपटगृहे,तरणतलाव, व्यायाम शाळा, नाट्यगृहे म्युझियम, कलाकेंद्रे, पर्यटनस्थळे, डिमार्ट, मॉर्ल्स, तंबाखू व तंबाखूजन्य धूम्रपानाचे पदार्थ इत्यादीची विक्री करणारे सर्व दुकाने/पानटपऱ्या, चहा,-नाष्टा, रसवंती, रेस्टॉरंट, आईस्क्रीम पार्लर,स्विटमार्ट बेकरी,फास्टफुड उदाहरणार्थ वडापाव,भेळ, पाणीपुरी इत्यादी पदार्थाची विक्री करणारे दुकाने/फिरते विक्रेते यांची  दुकाने तसेच आधार नोंदणी केंद्रे/ आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी केंद्र,महाऑनलाईन केंद्र चालू ठेवण्यास मनाई करण्यात येत आहे. 5)जिल्ह्यातील सर्व सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांना मनाई करण्यात येत आहे.
 हे आदेश उस्मानाबाद जिल्ह्यात दिनांक 21 मार्च 2020 पासून लागू  आहेत.


No comments