Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यासाठी दिलासा देणारी बातमी


उस्मानाबाद जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत कोरोनाचा  एकही पॉजिटीव्ह रुग्ण सापडलेला नाही. पुणे, मुंबई आणि विदेशातून आलेल्या १०३ जणांना होम क्‍वारंटाइन मध्ये  ठेवण्यात आले होते, पैकी ८७ जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. 

आजवर शहरी भागातील ३ हजार ४८९ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ८५ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. ८२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, उर्वरित ३ रिपोर्ट प्राप्त होणे बाकी आहेत. मात्र, यादरम्यान ७० जण विदेशातून परतले आहेत. त्यांचीही आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

जगात, देशात, महाराष्ट्रात कोरोना पाय पसरत असताना, उस्मानाबाद जिल्ह्यात अद्याप शिरकाव झालेला नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोक शासन, प्रशासन यांनी दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास कोरोना उस्मानाबाद जिल्ह्यात येऊ शकणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जातोय, 

तालुकानिहाय चाचणी अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक, उस्मानाबाद यांनी आज जाहीर केला आहे. 
असा आहे अहवाल No comments