Header Ads

मनाई आदेश असतांना दुकान उघडून सिमेंट विक्री केली, गुन्हा दाखल


पोलीस ठाणे, आनंदनगर: संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने शासनाने फक्त जिवनावश्यक वस्तु दुकाने- आस्थापना उघडे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करुन पवन कमलाकर मुंडे रा. कोट गल्ली, नेहरु चौक, उस्मानाबाद यांनी दि. 30.03.2020 रोजी 11.22 वा. सु. कोट गल्ली, नेहरु चौक येथील सिमेंट दुकान उघडे ठेउन सिमेंटची विक्री करत असतांना कायदेशीर आदेशाचे उल्लंघन केले. यावरुन पो.ठा. आनंदनगर येथील प्रकाश तरटे यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन त्यांच्याविरुध्द भा.द.वि. कलम- 188, 269 अन्वये गुन्हा दि. 30.03.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

मनाई आदेश झुगारुन प्रवाशी वाहतुक केली, गुन्हा दाखल.
पोलीस ठाणे, शिराढोण: कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने केलेल्या संचार बंदी आदेशाचे उल्लंघन करुन 1)सुरेश भिमराव कांबळे रा.जवळा 2)अशोक नानासाहेब अभंग रा.चौसाळा या दोघांनी दि. 29.03.2020 रोजी 14.30 वा. सु. सांगली येथील मजुरांना ट्रॅक्टर- ट्रॉली मध्ये अवैधरित्या मंगरुळ व जवळा येथे वाहुन आनत असतांना पो.ठा. शिराढोण यांच्या पथकास आढळले. यावरुन वरील दोन्ही आरोपीविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 271, 34 अन्वये गुन्हा दि. 29.03.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments