Header Ads

मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावर, उस्मानाबाद जिल्ह्यात 7 गुन्हे दाखलउस्मानाबाद : संसर्गजन्य आजार कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने संचारबंदी जाहीर आहे. रोग प्रसार टाळन्यासाठी नाका- तोंडास मास्क लावने गरजेचे असतांनाही 1)भिमाशंकर माधव गायकवाड रा.मानेगोपाळ, ता.उमरगा हा मानेगोपाळा येथे तर 2)अजय संग्राम सपकाळ, बालाजी भिमराव कांबहे, विजय दिलीप गायकवाड तीघे रा. उस्मानाबाद हे तीघे उस्मानाबाद येथे तीन वेगवेगळ्या ठिकाणी तर 3)परमेश्वर रामकिसन गोरे, बालाजी रामदास माने दोघे रा. गौर, ता.कळंब हे दोघे येरमाळा येथे 4)महेश बाळासाहेब माळकर, सुरज भिमराव लोंढे, बापुराव बाबु लोंढे तीघे रा. हिंगणगाव हे तीघे मौजे कोथळा येथे तर 5)गोपाळ बालाजी जाधव, सुनिल राजेंद्र निकम, मधुकर भागवत जाधव तीघे रा. हासेगांव, ता. औसा हे तीघे तुळजापूर येथे दि. 28.03.2020 रोजी सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याची काळजी न घेता नाका-तोंडास मास्क न लावता, संसर्ग पसरविण्याची घातक कृती करुन फिरत असतांना पोलीस पथकास गस्ती दरम्यान आढळुन आले. अशा प्रकारे वरील व्यक्तींनी लोकसेवकाने (जिल्हाधिकारी) दिलेल्या कायदेशीर आदेशाचे जाणीवपुर्वक उल्लंघन केल्याबद्दल भा.दं.वि. कलम- 188, 269 अन्वये वरील व्यक्तींविरुध्द स्वतंत्र 7 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे नोंदवण्यात आले आहेत.

No comments