कोरोना : जिल्ह्यातील सर्व एटीएम केंद्रामध्ये वारंवार स्वच्छता करण्याचे आदेश

 
कोरोना : जिल्ह्यातील सर्व एटीएम केंद्रामध्ये वारंवार स्वच्छता करण्याचे आदेश

उस्मानाबाद -जिल्हयातील सर्व सरकारी,सहकारी व खाजगी बँका,पतसंस्था व त्यांचे ATM केंद्रांमध्ये वारंवार नागरिक ये-जा करतात. त्यामुळे करोना विषाणू (COVID-19) चा प्रसार व प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हयातील सर्व सरकरी,सहकारी व खाजगी बँका,पतसंस्था व त्यांचे ATM केंद्रांमध्ये वारंवार स्वच्छता व वारंवार आवश्यक ती फवारणी करणे गरजेचे आहे  तसेच आवश्यक ती फवारणी वारंवार करण्याचे आदेश  जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी  तात्काळ लागू करण्यात येत आहे.

> कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रतिबंधात्मक खबरदारीच्या उपायोजना करण्याचे परिवहन आयुक्त,महाराष्ट्र,मुंबई यांनी आदेशित केले आहे.उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात विविध कामानिमित्त मोठया प्रमाणात अभ्यागतांचे येणे जाणे असल्यामुळे गर्दी जमा होते व त्यामुळे कोरोना विषाणू प्रसार होण्याची संभावना कमी करण्यासाठी खालील प्रमाणे प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत.

कार्यालयामध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना सर्व अधिकारी /कर्मचारी यांना देण्यात आलेल्या आहेत.करिता सर्व वाहनधारकांनी दि.31 मार्च 2020 पर्यंत केवळ वर नमूद केलेली कामे करण्यासाठी कार्यालयात यावे.त्या व्यतिरिक्त कार्यालयात गर्दी  करुन नये. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून वरील केलेल्या उपायोजना राबविण्यासाठी जास्तीत जास्त सहकार्य करावे,असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

             



From around the web