Header Ads

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात आज आणि उद्या जनता कर्फ्यू लागू

उस्मानाबाद - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यू   करण्याचा निर्णय घोषित केला होता, मात्र उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्यात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा एकही  पॉजिटीव्ह रुग्ण सापडलेला नाही, मात्र मात्र  परदेशातून आलेल्या दोघांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे.तसेच  जिल्हा बाहेरून आलेल्या ५९ नागरिकांना खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून घरात निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून  शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. अत्यवश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केला आहे.तसेच लोकांनी रस्त्यावर फिरू नये, आपल्या घरातच बंदिस्त व्हावे,असा आदेश काढण्यात आला आहेNo comments