Header Ads

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात आंदोलन आणि मोर्चावर मनाई

उस्मानाबाद - कोरोनाच्या पार्शवभूमीवर साथरोग अधिनियम 1897 च्या खंड 2 नुसार राज्यात मिळालेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र राज्यात साथरोग अधिनियमातील खंड 2,3 व 4 ची अंमलबजावणी दि.13 मार्च 2020 या दिनांकापासून सुरू केली आहे. त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यात विविध राजकीय पक्षांकडून किंवा संघटनांकडून सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी एकत्रित येऊन विविध मागण्यांसाठी होणारी विविध प्रकारची आंदोलने, रास्ता रोको, घंटानाद, उपोषण, धरणे, मोर्चे तसेच आत्मदहन इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रमांवर अशा ठिकाणी लोकांची गर्दी होत असल्यामुळे कोरोना विषाणू या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून  असे कार्यक्रम आयोजित करण्यावर पुढील आदेश होईपर्यंत मनाई करण्यात येत आहे, असे आदेश  जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 च्या नियम 11 नुसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय तसेच कायदेशीर कारवाईस पात्र राहील, याची संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, असे जिल्‍हा प्रशासनाने कळविले आहे.

 राज्यात विषाणूमुळे (COVID-19) उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्‍कालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे जागतिक आरोग्य संघटना व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणास्तवप्रसारित केलेल्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी व राज्यात या करोना विषाणूमुळे(COVID-19)  उद्भवलेल्या संसर्ग रोगाच्या नियंत्रणास्तव आपत्‍कालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली असल्याने साथरोग अधिनियम 1897 च्या खंड 2 नुसार राज्यात मिळालेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र राज्यात साथरोग अधिनियमातील खंड 2,3 व 4 ची अंमलबजावणी दि.13 मार्च 2020 या दिनांकापासून सुरू केली आहे.

No comments