Header Ads

पर्यटन स्थळे बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

उल्लंघन करणाऱ्यावर होणार दंडनीय तसेच कायदेशीर कारवाई


उस्मानाबाद - राज्यात विषाणूमुळे (COVID-19) उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्‍कालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे जागतिक आरोग्य संघटना व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणास्तव प्रसारित केलेल्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी व राज्यात या करोना विषाणूमुळे (COVID-19) उद्भवलेल्या संसर्ग रोगाच्या नियंत्रणास्तव आपत्‍कालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली असल्याने साथरोग अधिनियम 1897 च्या खंड 2 नुसार राज्यात मिळालेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र राज्यात साथरोग अधिनियमातील खंड 2,3 व 4 ची अंमलबजावणी दि.13 मार्च 2020 या दिनांकापासून सुरू केली आहे.

त्यानुसार जिल्ह्यामधील नळदूर्ग किल्ला,परंडा भुईकोट किल्ला, कुंथलगिरी व इतर पर्यटनस्थळे दि.31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 च्या नियम 11 नुसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय तसेच कायदेशीर कारवाईस पात्र राहील, याची संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, असे जिल्‍हा प्रशासनाने कळविले आहे.

No comments