Header Ads

कोरोना : गोंदियातील स्टेट बॅंक कर्मचारीही होम क्वारंटाईन !


 गोंदिया  - देशभरात ७३० हून अधिक जणांना कोरोनीची लागण झाली आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे १८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७० लोकांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. आज सांगलीत आणखी १२ रूग्ण कोरोना पॉजिटिव्ह आल्याने हा आकडा वाढला. तर नागपुरात ही आज कोरोनाचे नवे ५ रुग्ण आढळलेले आहेत तर गोंदियात एक रूग्ण आढळल्याने दिवसागणिक महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. केंद्र आणि राज्य सरकार यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काम करत आहेत. 

एक 24 वर्षीय पुरुष थायलंडची ट्रिप करून महाराष्ट्रातील गोंदिया येथे परतला होता, काही दिवसांनंतर त्याला कोरोना व्हायरसची संसर्ग झाला असल्याचे उघड झाले आहे.  त्याची कोरोनाची चाचणी  पॉजिटिव्ह  आली असल्याचे गोंदिया जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम नीमगडे यांनी शुक्रवारी सांगितले. सदर कोरोना बाधित पुरुष हा गणेश नगर परिसरातील असून छत्तीसगडच्या राजनांदगाव येथील मित्रांसह बँकॉकला फिरायला गेला होता आणि दहा दिवसांपूर्वीच गोंदियाला परत आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

परंतु दरम्यानच्या काळात सदर पुरूषाने गोंदियातील स्टेट बॅंकेच्या शाखेला काही कामानिमित्त भेट दिलेली होती. एकवीस तारखे रोजी तो साडेबारा ते दोन पर्यंत स्टेट बॅंकेतच उपस्थित होता असे सीसीटीव्ही फूटेजच्या चित्रिकरणातून उघड झाले, त्यामुळे आता गोंदियाच्या स्टेट बॅंकेच्या कर्मचारी वर्गाला आणि त्यांच्या कुटुंबियांनाही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पुढील काही दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर कोरोना बाधित रुग्णाच्या स्टेट बॅंकेतील भेटीमुळे, त्याच्या संपर्कात आल्यामुळे बॅंकेच्या गोंदिया शाखेतील सर्वच कर्मचाऱ्यांना आणि अनुषंगाने त्यांच्या कुटुंबियांनादेखील कोरोनाचा धोका उत्पन्न झाला आहे. नऊ एप्रिलपर्यंत या सर्वांना होम क्वारंटाईन मध्ये ठेवण्याचे निर्देश मिळाले असून स्टेट बॅंकेकडून ताबडतोबच गोंदिया शाखेचे निर्जंतुकीकरण करवून घेतले आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ज्या ठिकाणी राहत आहेत त्या भागाची पूर्ण स्वच्छता केली गेली असून त्याच्या कुटुंबातील सदस्यांनाचीही कोरोना विषाणूची चाचणी घेण्यात आलेली आहे तूर्तास चाचणीचा निकाल यायचा बाकी आहे.

स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तो परदेशातून आल्यामुळे त्याचे विलगीकरण करण्यात आले होते पण त्याने घरात अलग ठेवण्याच्या नियमांचे, होम क्वारंटाईनचे उल्लंघन केले आणि राजरोसपणे तो घराबाहेर जातानाचे आढळले. त्याच्या बँकॉक ट्रिपमधील राजनांदगावच्या एका मित्राची कोरोनाची चाचणी सकारात्मक आली, त्यानंतर ह्यालाही गोंदियाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी बुधवारी ताब्यात घेतले त्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले पण दरम्यानच्या काऴात तो घराबाहेर पडत असल्याने अनेक जणांना कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

No comments