कोरोना : दिलासा देणारी बातमी

 
महाराष्ट्रातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याला आज डिस्चार्ज मिळणार!


 कोरोना :  दिलासा देणारी बातमी

पुणे : एकीकडे कोरोनाचा विळखा वाढत चाललेला असताना पुण्यातून एक दिलासा देणारी बातमी आली आहे, महाराष्ट्रातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याला आज  नायडू रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने हे दाम्पत्य आता ठणठणीत होऊन आज गुढीपाडव्याला आपल्या घरी परतणार आहे.

पुण्यातील हे दाम्पत्य महाराष्ट्रातील पहिले कोविड-19 चे रुग्ण होते. दुबईहून परतलेल्या या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर होळीच्या दिवशी ते नायडू रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले. चौदा दिवसांनी त्यांची चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर दोन-तीन दिवसांनी त्यांचे नमुने पुन्हा एकदा घेण्यात आले. उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात येत आहे.अॅम्ब्युलन्समधून घरी सोडण्यात येईल.

दरम्यान या दाम्पत्याच्या संपर्कात आल्याने त्यांची मुलगी तसंच त्यांना मुंबईहून पुण्याला सोडणाऱ्या ओला कॅब चालकालाही कोरोनाची लागण झाली होती. दोघांवरही उपचार सुरु आहेत. दाम्पत्याच्या मुलीच्या पहिल्या चाचणीचे नमुने आज तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. तर चालकाच्या दुसऱ्या कोरोना चाचणीचा अहवाल यायचा आहे. दिलासादायक बाब म्हणजे त्याची पहिली चाचणी निगेटिव्ह आली आहे.

पुण्याचे मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी कालच फेसबुकवर ही माहिती दिली होती. 


 करोना व्हायरससंबंधी दररोज चिंता वाढवणाऱ्या बातम्या येत असताना आता एक दिलासा देणारी बातमी सुद्धा समोर आली आहे. सध्या देशभरात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५५० पेक्षा जास्त आहे. दररोज हा आकडा वाढत आहे. पण त्याचवेळी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या अनेक रुग्णांचे करोना चाचणीचे रिपोर्टही निगेटीव्ह येत आहेत. देशाच्या वेगवेगळया भागातील करोनाची बाधा झालेले ४८ रुग्ण उपाचारानंतर पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. सोमवारपर्यंत ३५ रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता.

From around the web