कोरोनाचा साईड इफेक्ट ; 10 ग्रॅम सोन्याची किंमत 36,000 रुपयांपर्यंत होणार

 

चांदी दोन आठवड्यांत 15000 रुपयांनी स्वस्त


कोरोनाचा साईड इफेक्ट ; 10 ग्रॅम सोन्याची किंमत 36,000 रुपयांपर्यंत होणार

कोरोना व्हायरसमुळे जगासह भारतीय बाजारात भीतीचे वातावरण आहे. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याच वेळी भारतीय अर्थव्यवस्थेच्या तीन चांगल्या बातम्या समोर आल्या आहेत. अलिकडच्या काळात सोने आणि चांदीच्या आकाशाला भिडलेल्या उच्च किंमती पटकन खाली घसरल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या लग्नसराईच्या हंगामात लाखो कुटुंबांची सोने चांदी खरेदी करताना बचत होऊ शकेल. तसेच
येस बँकचे संकटही टळले आहे.

सहा दिवसांत सोने 6000 रुपयाने घसरले
  कोरोना व्हायरसचा दुष्परिणाम बुलियन म्हणजे सराफा बाजारातही दिसून आलाय. कोरोनाच्या परिणामामुळे सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली. 1 मार्च ते 17 मार्च दरम्यान सराफा बाजारामध्ये सोन्याचा दर हा एका तोळ्यामागे सुमारे सहा हजार रुपयांनी स्वस्त झाले आहेत. 1 मार्च 2020 रोजी एमसीएक्सवरील सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 44 ,960 रुपये होतीजी 17 मार्चला दहा ग्रॅम 38,700 रुपयांवर आली. अशाप्रकारेसोन्यात सुमारे 13 टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचबरोबर सोन्याचे भाव 6000 रुपयांनी खाली घसल्याचे दिसत आहे.

एंजल ब्रोकिंग कमोडिटी अँड करन्सीचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी सांगितले कीयेत्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतीत आणखी घसरण होऊ शकते. सोने पुन्हा एकदा दहा ग्रॅम ला   36,000 रुपयांवर घसरेल. म्हणूनच लहान गुंतवणूकदारांनी सोन्यापासून दूर रहावे. त्याचबरोबर दिल्लीत मंगळवारी सोन्याचे दर दहा ग्रॅम 80 रुपयांनी घसरून 39,719 रुपयांवर गेले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 1,483 वर घसरला.

चांदी   दोन आठवड्यांत 15000 रुपयां नी  स्वस्त
कोरोनाच्या परिणामामुळे चांदीच्या किंमतीही खाली आल्या आहेत. 1 सप्टेंबर 2019 रोजी चांदीची किंमत प्रति किलो 53 ,408 रुपये होतीजी 17 मार्चपर्यंत घटून 34,500 रुपये झाली. येत्या काळात चांदी पुन्हा एकदा प्रती किलो 30,000 पर्यंत पोहोचू शकते. सराफा तज्ञांच्या मते चांदी हा बेस अर्थव्यवस्था मानला जातो. औद्योगिक क्षेत्रात चांदीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. चांदी ही मोबाइल आणि सौर पॅनेल इ. इलेक्ट्रॉनिक उत्पादनांमध्ये वापरली जाते.   कोरोनामुळे चांदीचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. यामुळे किंमतीत वेगाने घट होत आ हे. मंगळवारी चांदीचा दरही   734   रुपयांनी घसरून 35 ,948 रुपये प्रति किलो झाला.त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत प्रति औंस 12.53 डॉलर होती .

येस बँकेची आठवड्याभरात 1155% नी उभारी
येस बँकेच्या शेअर्समध्ये गेल्या सात दिवसांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेने येस बँकेच्या कामकाजावर काही निर्बंध लादल्यानंतर 6 मार्च रोजी बँकेचे समभाग 5.55 रुपयांवर गेले. त्याचवेळी येस बँकेचे समभाग 17 मार्च रोजी प्रति शेअर 64.15 रुपयांवर गेले होते. त्यानुसार सात व्यापारदिवसांत कंपनीचे शेअर्स 1155% नी वाढले.   18 मार्चपासून येस बॅंकेच्या ग्राहकांच्या व्यवहारावरील मर्यादा हटविली जाईल असे बँकेने जाहीर केले आहे. येस बँक संकट आता टळले आहे असे रुंगटा सिक्युरिटीजचे आर्थिक नियोजक हर्ष वर्धन रुंगटा यांनी सांगितले. आरबीआय नंतर अनेक सरकारी आणि खासगी बँकांकडून येस बॅंकेला गुंतवणूक प्राप्त झाली आहे. त्यामुळे येस बँकेची आर्थिक स्थिती मजबूत होईल. यामुळे पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे. आवश्यक असल्यास बँकेला अधिक तरलता प्रदान करण्यासाठी येस बँकेकडे पुरेशी तरलता येईल असेही आरबीआयने म्हटले आहे.


From around the web