Header Ads

कोरोनापासून बचाव करण्यासाठी करा ' महाव्याधी मंत्र' जप करा - बह्मचारी वागीश शास्त्री

लखनऊ - भारत हा सनातन धर्मावर विश्वास ठेवणारा देश आहे. येथील धर्म पुस्तकांमध्ये भूमीपासून संपूर्ण विश्वापर्यंतच्या समस्यांचे निराकरण आहे. याला शास्त्र सहमत आहे तसेच वैज्ञानिक निकषही पूर्ण केले आहेत. भारतासह जगभराला कोरोना विषाणूचा धोका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळण्य़ासोबतच स्वच्छताशांतता आणि सतर्कतेचे आवाहन केले आहेतर सनातन धर्मावलंबींनी मोदींच्या जनतेला केलेल्या आवाहनाचे स्वागत केले आहे तसेच धर्मग्रंथात व भारतीय शास्त्रांत नमूद केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे सुचवले आहे.

तरुण संत ब्रह्मचारी वागीश शास्त्री यांनी कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी शक्ती मंत्राचा जप करण्याचे जनतेला आवाहन केले आहे. तसेच त्यांनी सांगितले की, सनातन धर्मात रोगांचे निदान करण्यासाठीही मंत्रांचा उपयोग केला जातो. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी त्यांनी महाव्याधी मंत्र - 'अच्युताय नम:अनन्ताय नम:गोविन्दाय नम:नामक जप करण्यास सांगितले आहे. हा महाव्याधी विनाश आणि शमन मंत्र आहे. घरी बसून या मंत्राचा सतत जप करावा. या मंत्राचा जप केल्याने केवळ कोरोनाच नव्हे तर प्रत्येक रोगाचा समूळ नाश होतो व ही मान्यतेची बाब आहे. या मंत्रावर विश्वास नसलेल्या लोकांनी या मंत्राचा जप करण्याचा कोणताही दबाव नाही.

शुद्ध व स्वच्छ होऊन आपण या मंत्राचा जप केल्यास कोरोना विषाणूपासून बचाव होऊ शकतो. या मंत्राचा जप केल्याने सर्व रोग नष्ट होतात. हा सनातन धर्माचा प्रमाण मंत्र आहेही कल्पनाशक्ती नाही. हा मंत्र श्रद्धावान लोकांसाठी आहे. या कोरोना विषाणूने अजिबात घाबरू जाऊ नका. धर्माचे उगाचच थोतांड करू नका, बाजारात जाऊ नकामंदिरात जाऊ नका. नियमांचे पालन करा आणि आपापल्या पंथानुसार उपासना करा.

ते म्हणाले की, 'दुर्गति-नाशिनी दुर्गा जय जयकाल विनाशिनी काली जय जय। व्याधि विनाशिनी ललिता जय जयरोग नाश तो हर-हर शंकरया मंत्राचा अगदी प्राचीन काळापासून आपल्या धार्मिक पुस्तकांमध्ये उल्लेख आहे. त्यांनी आपला व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. जगभरात कोरोना विषाणूबाबत भय कायम आहे. माझा विश्वास आहे की, कोरोनाविषयी भीती दाखविण्यापेक्षा जागरुक राहणे अधिक चांगले राहिल.

 जनता कर्फ्यू चे पंतप्रधानांचे आवाहन देशातील जनतेने मनोभावे पाळले जाणे आवश्यक आहे. त्यांच्या आवाहनामुळे आपण कोरोना या महामारीचा नाश करू शकतो. आपले कुटुंब, देश सुरक्षित रहावा यासाठी मी बाबा विश्वनाथाची प्रार्थना केलेली आहे.

No comments