जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे यांच्यावर कारवाईची मागणी

 
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे यांच्यावर कारवाईची मागणी

उस्मानाबाद - कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ  जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना रावबत असताना, जिल्हा शासकीय रुग्णालयातील गलथान कारभार परवा चव्हाट्यावर आला होता. समुद्रवाणीच्या एका व्यक्तीला स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्याने कोरोना संशयित म्हणून उस्मानाबादच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवल्यानंतर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जवळपास एक तास तपासणी न करता ताटकळत ठेवले होते मात्र उस्मानाबाद लाइव्हच्या वृत्तानंतर त्यास कोरोना वार्ड मध्ये भरती करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक  कार्यकर्ते  बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे. 

उस्मानाबाद तालुक्यातील  समुद्रवाणी  येथील ५५ ते ६० वयोगटातील एक व्यक्ती पिंपरी चिंचवड मध्ये आपल्या नातेवाईकाकडे गेला होता, गावी परत आल्यानंतर  काही ग्रामस्थांनी कोरोनाच्या भीतीमुळे त्यास स्थानिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर १७ मार्च रोजी स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्यास अ ब्युलन्सने जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे कोरोना संशयित रुग्ण म्हणून पाठवले, पण तो येथे आल्यानंतर कोरोना वार्डच बंद होता. तो एक तास त्या कोरोना वार्डसमोर उभा होता, पण कुणीही कर्मचारी फिरकला नाही.यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमारे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे यांना  फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही, इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हात झटकले. काही कर्मचारी कोरोना संशयित रुग्ण म्हणून पळून गेले. 

त्यानंतर उस्मानाबाद लाइव्हने पुराव्याच्या आधारे बातमी दिल्यानंतर त्यास कोरोना वार्ड मध्ये भरती करण्यात आले. त्यानंतर त्या  व्यक्तीची   तपासणी केली असता तो ठणठणीत निघाला, पण याप्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील गलथान कारभार समोर आला. यातून जिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गलांडे यायची बेफिकीर वृत्ती दिसून आली. कोरोना सारख्या गंभीर आजारावर जिल्हा शासकीय रुग्णालय दक्ष नाही हे समोर आले आहे. 

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक  कार्यकर्ते  बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे. 

या प्रकरणी संबंधित व्यक्ती, संजय वाघमारे यांचे जबाब नोंदवण्यात यावेत तसेच दोषी वैद्यकीय अधिकारी  तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे यांच्यावर  कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणीही करण्यात आली आहे.

उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयातील अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खासगी हॉस्पिटल थाटले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाकडे त्यांचे अजिबात लक्ष नाही, कोरोना सारख्या गंभीर आजाराबाबत सुद्धा ते दक्ष नाहीत असा आरोप सुभेदार यांनी केला आहे.

पाहा व्हिडीओ  




संबंधित बातम्या 

उस्मानाबाद लाइव्हच्या दणक्यानंतर कोरोना वार्ड उघडला ...

घाबरू नका : तो व्यक्ती ठणठणीत !

From around the web