उस्मानाबाद-कळंब मतदारसंघातील रस्ते विकासासाठी २६ कोटींचा निधी

 
उस्मानाबाद-कळंब मतदारसंघातील रस्ते विकासासाठी २६ कोटींचा निधी

उस्मानाबाद- कळंब विधानसभा मतदारसंघातील प्रमुख दहा रस्त्यांच्या विकासासाठी राज्य शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत २६ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पातून मंजूर केला आहे. यामुळे सदरील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी हा निधी महत्त्वाचा ठरणार असल्याची माहिती या मतदारसंघाचे शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना आमदार कैलास पाटील यांनी म्हटले आहे की, उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदार संघातील रस्त्यांच्या विकासकामासाठी मागील काही महिन्यापासून सतत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येत होता. याच पाठपुराव्याला यश येऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्यातून २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात विधानसभा मतदारसंघातील प्रमुख १० रस्त्यांच्या विकासकामासाठी २६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
शिक्षक कॉलनी ते स्टेशन रोडच्या कामासाठी ५ कोटींचा निधी : उस्मानाबाद शहरातील शिक्षक कॉलनी ते रेल्वे स्टेशन रस्त्याचीही मोठ्या प्रमाणात दूरावस्था झाल्याने दररोज ये-जा करणाऱ्या हजारो वाहनधारकांची प्रचंड गैरसोय होत होती. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आमदार कैलास पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून या रस्ताकामासाठीही तब्बल ५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे सदरील मार्गावरील शिक्षक कॉलनी, जिजाऊनगर, प्रकाशनगर यासह परिसरातील हजारो नागरिकांची होणारी प्रचंड गैरसोय थांबण्यास मदत होणार आहे.
मतदारसंघनिहाय रस्ता व मंजूर निधी{ देवधानोरा – एकुरगा – शिराढोण- ३ कोटी 10 लाख. { पिंपळगाव – गोजवडा- बावी- परतापूर- तडवळा- २ कोटी ५० लाख. {मांडवा – गोविंदपूर – वाटवडा रस्ता- ५ कोटी. {शिक्षक कॉलनी ते रेल्वे स्टेशन रस्ता – ५ कोटी. {बावी- खामसवाडी- केशेगाव- बावी -१ कोटी. {मुरूड ते जागजी- २ कोटी ५० लाख. {जागजी ते कोंड- १ कोटी १० लाख. {चिलवडी ते राघूचीवाडी – १ कोटी ६० लाख. {खेड- खामगाव – तडवळा रस्ता- १ कोटी २० लाख. {कावळेवाडी- बुकनवाडी- म्होतरवाडी-३ कोटी

From around the web