Header Ads

नितीन काळे म्हणजे तुळजापूरच्या आमदाराचा बोलका पोपट

आ. कैलास पाटील यांच्या समर्थकांकडून खिल्ली 

उस्मानाबाद - शिवसेना आमदार कैलास पाटील यांच्यावर कागदी बाण सोडल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांची पाटील समर्थकांनी खिल्ली उडवली आहे. काळे म्हणजे तुळजापूरच्या आमदारांचा बोलका पोपट असल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली आहे.उस्मानाबाद - कळंब विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी उस्मानाबाद- कळंब तालुक्याचे प्रश्न विधानसभेत  मांडले होते.त्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी, आ. कैलास पाटील यांचा केवळ पब्लिसिटी स्टंट असल्याचे पत्रक प्रसिद्ध केले होते.

आ. कैलास पाटील यांचा केवळ पब्लिसिटी स्टंट - नितीन काळे

त्यानंतर आ. कैलास पाटील  समर्थकांनी काळे यांची चांगलीच  खिल्ली उडवली  आहे. काळे म्हणजे तुळजापूरच्या भाजप आमदारांचा बोलका पोपट असल्याची टीका आ. कैलास पाटील  समर्थकांनी  सोशल मीडियावर केली आहे. काळे हे स्वतःचे काही बोलत नाहीत, तुळजापूरचे आमदार जसे सांगतात तसे बोलतात, अशी घणाघाती टीका केली आहे.

पाहा कमेंट 

No comments