Header Ads

कोरोना : अणदूरचे श्री खंडोबा मंदिर बंदअणदूर  - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अणदूरचे श्री खंडोबा  मंदिर आज ( शुक्रवार) पासून बंद  करण्यात आले आहे. इतिहासात प्रथमच अणदूरचे मंदिर बंद झाले असून गावातील तसेच परगावच्या भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. 

कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून पुजारी मंडळ आणि श्री खंडोबा मंदिर समिती सदस्यांच्या बैठकीत हा  निर्णय घेण्यात आला होता, त्याची अंमलबजावणी आजपासून सुरु झाली आहे.३१ मार्च पर्यंत मंदिर बंद राहील, असे श्री खंडोबा मंदिर समितीचे अध्यक्ष प्रकाश मोकाशे यांनी सांगितले.

उत्तर व्दार 


तुळजापूर तालुक्यातील अणदूर  येथील श्री खंडोबा मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. श्री खंडोबा - बाणाई विवाह स्थळ असल्याने येथे दररोज भाविकांची गर्दी असते. महाराष्ट्र विशेषतः पुणे, मुंबई तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश भाविक  दर्शनासाठी येत असतात. मंदिर प्राचीन असून, मंदिर हेमांडपंथी आहे.


उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरची तुळजाभवानी, येरमाळ्याची येडेश्वरी, चिवरीची महालक्ष्मी  नुकतेच बंद करण्यात आले आहे. त्यानंतर अणदूरचे मंदिरही बंद   ठेवण्याचा निर्णय इतिहासात प्रथमच घेण्यात आला आहे.

आज प्रथमच श्री खंडोबा मंदिराचे उत्तर व्दार आणि पश्चिम  व्दार  बंद दिसले. नेहमी  गर्दी असलेल्या ठिकाणी शुकशुकाट दिसला. गावात भयाण शांतता पसरली आहे, आजवर आम्ही असे वातावरण कधीच पहिले नाही,असे वृद्ध लोक सांगत आहेत.

पश्चिम  व्दार 

No comments