कोरोना : इटलीमध्ये 24 तासांत 368 जणांचा मृत्यू

 
कोरोना : इटलीमध्ये 24 तासांत 368 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने जगात हाहाकार माजवला आहे.कोरोनामुळे  इटलीमध्ये 24 तासांत 368 जणांचा मृत्यू झाल्याने जगभरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

कोरोना व्हायरसमुळे चीननंतर इटलीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त आहे.चीनमध्ये मागील 24 तासांमध्ये फक्त 14 जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये जरी कोरोनाचा कहर कमी होत असेल तरी इटलीमध्ये मात्र कोरोनामुळे परिस्थिती आणखी गंभीर होत आहे.

चीननंतर कोरोना व्हायरसचा सर्वाधिक परिणाम इटलीमध्ये पाहायला मिळत आहे. येथे आतापर्यंत कोरोनामुळे 1809 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे 3509 नवीन रूग्ण समोर आले आहेत. आतापर्यंत इटलीमध्ये एकूण 24, 747 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 2335 लोक या व्हायरसमुळे बरेही झाले आहेत. इटलीमध्ये गेल्या 14 तासांत जवळपास 368 लोकांचा मृत्यू झाला आहे.

 जगभरात आतापर्यंत 6515 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 157 देशांमध्ये 1 लाख 69 हजार 500 एवढी कोरोनाबाधितांची संख्या आहे.

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 37 वर गेली आहे. मुंबईत 3 आणि नवी मुंबई एक कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8 वर आणि नवी मुंबतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दोन झाली आहे. कालही पिंपरी चिंचवडमध्ये एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला होता.


  • इराणमध्ये 1209 कोरोना बाधित, मागील 24 तासांत 113 लोकांचा मृत्यू
  • 24 तासांमध्ये स्पेनमध्ये 96 तर फ्रान्समध्ये 36 लोकांचा मृत्यू
  • अमेरिकेत 24 तासांत 11 जणांचा मृत्यू, 771 जणांना कोरोनाची बाधा

From around the web