Header Ads

कोरोना म्हणजे नेमके काय रे भाऊ ?

जाणून घ्या लक्षणे आणि उपचार .. 


कोरोना व्हायरसने जगात हाहाकार माजवला आहे.कोरोनामुळे  इटलीमध्ये 24 तासांत 368 जणांचा मृत्यू झाल्याने जगभरात प्रचंड खळबळ उडाली आहे. जगभरात आतापर्यंत 6515 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 157 देशांमध्ये 1 लाख 69 हजार 500 एवढी कोरोनाबाधितांची संख्या आहे.राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 37 वर गेली आहे.

कोरोना म्हणजे काय ?

करोनाचा नवीन विषाणू हा सार्स म्हणजे सिव्हीयर अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम- सीओव्ही १ विषाणूचा दुसरं रुप आहे. त्यामुळे त्याला सीओव्हीआयडी १९ बरोबरच सार्स सीओव्ही २ असंही नाव देण्यात आले आहे. आता करोनाचा हा विषाणू १३० हून अधिक देशात पसरलेला आहे. या विषाणूच्या संसर्गावर उपचारच नाहीत असे सांगितले जात असले, तरी त्यात पूर्ण तथ्य नाही. कारण जगात इतर अनेक विषाणूजन्य रोग आहेत. त्यावर मात करण्यात पूर्वीच यश आले आहे.


करोना विषाणू शरीरात गेल्यानंतर ताप, कफ, श्वाास अडखळणे, थकवा, ही लक्षणे दिसतात. करोना विषाणूवर कुठली लस उपलब्ध आहे का? तर करोना संसर्गावर सध्यातरी लस उपलब्ध नाही. पण ती उपलब्ध होण्यास आता अजून सहा ते आठ महिने तरी लागतील. भारतात अशी लस बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


रूग्णालयात दाखल केल्यानंतर काय केलं जातं?


चीनमधील जी माहिती हाती आली आहे, त्यानुसार निर्जलीकरण टाळण्यासाठी द्रव पदार्थ दिले जातात. ताप उतरवण्यासाठी पॅरासिमटेमॉलपासून इतर औषधे दिली जातात. ऑक्सिजनचा पूरक आधार दिला जातो. ज्यांना श्वास घ्यायला कठीण जाते त्यांना कृत्रिम श्वासावर ठेवले जाते

No comments