• पक्या आणि बबल्या फडणवीस साहेबाना मेल पाठवण्यासाठी बस स्टॅन्डजवळील एका नेट कॅफेमध्ये जातात.त्यांना पाहून तेथे कामावर असलेला मुलगा दोघांकडे पहात... काय पाहिजे ?
  पक्या - आम्हाला मेल पाठवायचा हाय...
  मुलगा - तुमची आयडेंटी दाखवा...
  पक्या - म्हंजी ते काय असतं ?
  मुलगा - अहो ओळखपत्र,आधार कार्ड...
  पक्या - ते घरात इस्सरलं हाय...माझी अख्या उस्मानाबादला ओळख

 • माननीय बापट साहेबांना,
  उस्मानाबादहून पक्याचा सप्रेम नमस्कार...
  साहेब,तुम्ही मला ओळखत नाय.पण म्या तुमचं नाव रोज पेपरात वाचतो.हातानं पत्र लिहिण्याची पध्दत बंद झाल्यानं बबल्याकरवी तुम्हास मेल धाडत हाय.तर मेल धाडण्याचं कारण असं की,दिवाळी संपून शिमगा आला तरी तूरदाळ अजून १७० रूपयांनचं मिळत हाय.त्यामुळं आमची गंगी आमटीत चिमूटभर दाळ आणि बचकभर लाल तिखट घालत

 • माननीय मोदी साहेबांना,
  उस्मानाबादहून पक्याचा सप्रेम नमस्कार...
  साहेब,म्या पक्या उस्मानाबादकर.पुर्वी तुमच्यासारख्या मोठ्या लोकांना हातानं पत्र लिहून पोस्टानं पाठवत व्हतो.पण आता कसलं तर डीजीटल युग आलं हाय म्हण,असं आमच्या शेजारचा बबल्या सांगत व्हता.म्हणून त्याच्याकडूनच आपणास मेल पाठवत हाय.बबल्या म्हंजी आमच्या तुक्याचा पोरगा.बारावीत शिकतय.
  अजून त्यास मिसरूड फुटायचं हाय पण त्याला सगळं येतं.म्हंजी मेल पाठवणं,मोबाईलवर

 • उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठेवीदारांच्या जवळपास ४०० कोटी रूपयाच्या ठेवी अडकल्या आहेत.येणे बाकी ७७४ कोटी आहे.त्यापैकी तेरणा कारखान्याकडे २३६ कोटी १५ लाख तर तुळजाभवानी कारखान्याकडे १०५ कोटी ६६ लाख रूपये अडकले आहेत.दोन्ही कारखान्याकडे मिळून साडेतीनशे कोटी रूपये अडकले आहे.या कारखान्याकडील वसूली झाली तर ठेवीदारांचे पैसे परत करता येतील,असे बँकेचे चेअरमन

 • उस्मानाबाद नगर पालिकेच्या आवारातच करोडो रूपये खर्च करून नाट्यगृह बांधण्यात आले आहे.त्याचे उद्घाटन सहा वर्षापुर्वी मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आले होते,परंतु प्रत्यक्षात हे नाट्यगृह सुरू झालेले नाही.दिवाळीत या नाट्यगृहात एक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला आणि लोकांना वाटले हे नाट्यगृह सुरू झाले की काय,पण हाय रे देवा,अजून बरेच काम बाकी आहे.
  सहा

 • उस्मानाबादला दर रविवारी आठवडी बाजार भरतो.या बाजारात आजूबाजूचे शेतकरी शेतात पिकलेली भाजी विक्री करण्यास येत असतात.सध्या दुष्काळ आहे.बिचारे शेतकरी अत्यल्प पाण्यावर भाजीपाला पिकवत आहेत आणि हातात चार पैसे पडतील म्हणून धडपडत आहेत.परंतु त्यांच्यावर जुल्म आणि अत्याचार केला आहे आणि नगरपालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी डोळ्यावर काळी पट्टी बांधून गांधारीप्रमाणे गप्प आहेत.
  आठवडी

 • तूरडाळीचे भाव कधी नव्हे २०० रूपयापर्यंत गेले होते.राज्य सरकारने छापेमारी सुरू केल्यानंतर १६० रूपयांपर्यंत आले आहेत.याचाच अर्थ बड्या व्यापा-यांनी तूरडाळीची साठेबाजी केलेली आहे आणि राज्य सरकारचे त्यावर नियंत्रण नाही,हेच स्पष्ट होते.गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रात विशेषत: मराठवाड्यात पाऊस कमी झालेला असून,तूरडाळीचे उत्पादन घटलेले आहे.अश्या परिस्थितीत राज्य सरकारने विदेशी तूरडाळ आयात करणे

 • राम खटके साडेतीन वर्षापुर्वी दिव्य मराठीत सिटी रिपोर्टर म्हणून ज्वाईन झाला.त्यापुर्वी तो लातूरहून प्रकाशित होणा-या दैनिक यशवंतचा उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी होता.यशवंतचे संपादक ओमप्रकाश मोतीपवळे हे माझे खास मित्र.मी लातूरला १९९० मध्ये एम.ए.करत असताना,दैनिक यशवंतमध्ये वृत्तसंपादक होतो.मोतीपवळे घराण्याशी माझे कौटुंबिक संबंध.माझ्या शिफारशीनुसारच राम यशवंतमध्ये ज्वाईन झाला होता.
  रामची आर्थिक परिस्थिती मी जाणून

 • राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे रविवारी उस्मानाबादच्या दौ-यावर आले होते.सरकारच्या वर्षेपुर्तीनिमित्त त्यांनी जिल्ह्यातील काही गावांना भेटी देवून दुपारी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लोणीकरांना देता आली नाहीत.
  राज्यात एकूण पाण्याची परिस्थिती काय आहे,किती दिवस पाणी साठा पुरेल आणि पाणी संरक्षित करण्यासाठी सरकारने काय उपाययोजना आखल्या आहेत,हा

 • अगोदर आर्थिक घोटोळे करायचे,नातेवायकांना बेकायदेशीर कर्ज वाटप करायचे आणि नंतर बँक अडचणीत सापडली की,राज्य सरकारकडे मदतीसाठी दाहो फोडायचा ही बड्या राजकीय पुढा-यांची खेळी आहे.या खेळीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच लगाम घातला आहे.
  उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेवर गेल्या अनेक वर्षापासून डॉ.पद्मसिंह पाटील यांचे वर्चस्व आहे.सन २००२ मध्येही त्यांचेच चुलत बंधु चेअरमन