
पत्रकारितेच्या २० - २५ वर्षाच्या कारकिर्दीत माझ्यावर तीन गुन्हे दाखल झाले. हे तिन्ही गुन्हे फॉल्यस् असून, माझ्या प्रगतीला खिळ घालण्यासाठी विरोधकांनी रचलेले षडयंत्र आहे.तीन पैकी एका गुन्ह्यातून सुटका झाली असून, दोन गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत. अशा गुन्ह्यात काय होते, हे मला माहित आहे, मात्र त्यामुळे मला व माझ्या कुटुंबाला जो त्रास झाला, तो न भरून येणारा आहे.प्रत्येक वेळी विरोधक माझ्यावर खेळी करतात, मात्र त्यावर मात करून पुन्हा मी त्याच ताकदीने उभा राहतो.
तुळजापूर तालुक्यातील अणदूर हे माझे गाव.एका गरीब कुटुंबात जन्म झाला.त्यात माझी गुरव जात अल्पसंख्याक.कोणाचाही आधार नाही. स्वबळावर पत्रकारितेत मानाचे स्थान पटाकाविले.सन १९९१ ते २००० पर्यंत दैनिक एकमतची कारकिर्द प्रचंड गाजविली.पत्रकारितेत कोणाशीही तडजोड केली नाही.जे सत्य आहे,ते मांडले. समोरचा कितीही मोठा असला तरी, त्याचा मुलाहिजा ठेवला नाही.त्यामुळे एक निर्भिड व निपक्ष पत्रकार म्हणून माझी ओळख निर्माण झाली.पत्रकारितेतील चांगल्या कामगिरीमुळे अनेक पुरस्कार मिळाले.नेमके हेच माझ्या विरोधकांना खटकत होते.त्यांचे किराणा दुकान माझ्यामुळे बंद झाले होते.त्यामुळे माझे खच्चीकरण करण्यासाठी गुप्त कारवाया चलत असत.जमल्यास स्वत:च्या लघु वृत्तपत्रातून माझ्याविरोधात खोट्या बातम्या देवून बदनामी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जात होता.’ मात्र हाथी चलता है, कुत्ता भुकता है’ , म्हणून मी दुर्लक्ष करीत असत.
सन २००० मध्ये दैनिक एकमतचा स्वत:हून राजीनामा दिल्यानंतर, विरोधकांना बळ आले.माझ्या जागी आलेला अडमुठ्या व हंबीररावांचे सुत जमले.त्यांनी मला उस्मानाबादहून पळवून लावण्याचा कट रचला,मात्र त्यांच्या नाकावर टिच्चून मी अजूनही उभा आहे.
सन २००४ मध्ये अडमुठ्या व काळकुट्या एका सकाळवाल्याला घेवून राधिका बिअरबारमध्ये दारू पित असताना, वेटरकडून मार खाल्ला.त्याची बातमी सह्याद्री दैनिकाने दिली म्हणून, अडमुठ्याने काही जळकी लाकडे गोळा केली.या जळक्या लाकडांनी मला संपविण्याचा विडा उचलला.
सन २००४ मध्ये माझे उस्मानाबादेत इंटरनेट कॅफे होते.या कॅफेमध्ये ब्ल्यू फिल्मची सीडी टाकून, ’ पाप’ कर्म करण्यात आले.मात्र परमेश्वर कृपेने ही सीडी पोलिसांच्या हवाली लागली नाही.यातून वाचलो म्हणून, दुस-या दिवशी एका भाग न घेतलेल्या हाणामारीच्या गुन्ह्यात अडकाविण्यात आले.त्याचदिवशी माझ्या वडिलांचे अपघाती निधन झाले होते.त्यामुळे पोलिसांनी मला अटक केली नाही, महिन्याने या प्रकरणी परस्पर कोर्टात हजर राहून,जामिन घेतला.नंतर हा खटला पाच वर्षे चलला.फिर्यादी व साक्षीदार कोर्टात हजर न झाल्यामुळे या खटल्यातून माझी निर्दोष मुक्तता झाली.
त्यानंतर सन २०११ मध्ये एका कृष्णाला घेवून मी ’ आज उस्मानाबाद’ नावाचे ई - पेपर सुरू केले होते.पंरतु या कृष्णाला एका गोपिकेमुळे उपरती आली, त्याने माझे हे ई - पेपर बळकावून माझ्यावर कार्यालयावर हल्ला केल्याचा खोटा गुन्हा नोंदविला.या गुन्ह्यात मी अटकपुर्व जामिन मिळविला.मीच स्थापन केलेल्या कार्यालयात मीच हल्ला केल्याचा गुन्हा अत्यंत दु:ख देवून गेला.चार खुच्या पालथ्या घालून हे षडयंत्र रचण्यात आले होते.या हल्यात काचेची फुटाफुट किंवा कॅमेरा, टेबलची फुटाफुट नाही,मॅनेज करून कसे एखाद्याला अडकाविण्यात येते, हे कृष्णाकडून शिकावे.या कृष्णाला हंबीररावांची साथ मिळाल्यामुळे त्याला स्फुरण आले होते.मात्र काही दिवसांतच त्याचा फुगा फुटला.’ आज उस्मानाबाद’ आता ’ काल उस्मानाबाद’ झाले आहे आणि ’ उस्मानाबाद’ आता ’ लाइव्ह’ झाले आहे.या गुन्ह्यात मला अटकपुर्व जामिन मिळाल्यामुळे कृष्णाचे व हंबीररावांची कृष्णकृत्ये पालथी पडली होती.सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
त्यानंतर परवा झालेला सकाळचा प्रकार.याबाबत मी सविस्तर लिहिले आहेच.आयुष्यात तीन गुन्हे दाखल झाले, तेही काहीही न करता.कायदा खराच गाढव आहे का असा प्रश्न कधी - कधी पडतो.कारण जे खरे गुन्हेगार आहेत,त्यांच्यावर लवकर गुन्हा दाखल होत नाही,आणि गुन्हा दाखल झाला तरी,अनेक गुन्हेगार मोकाट सुटतात.मात्र निरापराध लोकांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागते.
मला संपविण्याचा घाट काही तथाकथित पत्रपंडितांनी घातला आहे, मात्र त्यांचे लेखणीतून श्राध्द घालण्याचा निर्णय मी आता घेतला आहे.तुर्त एवढेच बस्स.
*सुनील ढेपे