
रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मूर्तीची चोरी झाली, त्याला आठ दिवस उलटून गेले तरी दरोडेखोरांचा अध्याप तपास लागलेला नाही.त्यामुळं पोलिस आणि सरकारबद्दल भाविकांच्या मनात तीव्र संतापाची भावना आहे.याच भावनेचं राजकारण करीत शिवसेना आता आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.शुक्रवारी विधानसभेत शिवसेनेच्या आमदारांनी ‘बाप्पा गेले चोरीला,चैन पडेना जीवाला’ म्हणत जो गांधळ घातला तो अशोभनिय आणि सभागृहाची अप्रतिष्ठा करणारा जसा होता तसाच तो मुळ मुद्याला बगल देणाराही होता.या प्रकाराने गणेश मूर्तीच्या चोरीच्या दुःखा पेक्षा शिवसेनेला त्याचं राजकारण करण्यातच रस आहे हेच अधोरेखित झालं. शिवसेनेला अन्य कोणत्याही विषयांपेक्षा धार्मिक,भावनिक,प्रांतिक विषयात रस असतो. हे विषय सहज लोकांच्या गळी उतरविता येतात आणि अशा विषयांवरून लोकांची माथी देखील लगेच गरम होतात.हे शिवसेनेला आपल्या प्रदीर्घ अनुभवातून उमजलेलं सत्य आहे.एकदा लोकांची माथी भडकली की मग त्याचं राजकारण करणं सोपं जातं.शिवसेनेचा इतिहास हाच आहे.भावनेचंच राजकारण करीत सेनेनं आतापर्यतचा प्रवास केला. म्हणूनच असा कोणताही विषय दुर्लक्षिला जाणार नाही याची काळजी सेना नेतृत्व सातत्यानं आणि डोळयात तेल घालून घेत असतं.दिवेआगर येथील मूर्तीच्या चोरीची बातमी येताच सेना कार्याध्यक्ष तातडीनं दिवेआगरला गेले ते शिवसेनेच्या याच स्वभावामुळं. तेथं गेल्यावर त्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जनतेच्या भावना कशा भडकतील याची काळजी घेतली.तातडीनं रायगड बंदची हाकही दिली.राज्यभर घंटानाद कार्यक्रमाचं आयोजन केलं.रायगड बंदला जनतेनं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.त्यानं सेना नेते हुरळून गेले.केवळ गणेश मूर्तीची चोरी झाल्यामुळंच जनता रस्त्यावर आली असं शिवसेनेला वाटलं आणि मग हा विषय घेऊऩच अधिवेशन गाजवायचं असा निर्धाऱ सेना नेर्तृत्वानं केला.हा निर्धाऱ करताना सेना नेत्यांच्या एक गोष्ट लक्षात आली नाही की,केवळ गणेश मूूर्तीची चोरी झाल्यामुुुळेच रायगडची जनता बंदमध्ये सहभागी झालेली नाही.गेली सहा महिने रायगडात ज्या घटना घडत आहेत त्यामुळं वैतागलेल्या जनतेनं ‘बंद करून बघू’ या भूमिकेतून कडकडीत बंद पाळला.बिरवाडीच्या दरोड्यानंतर जरी अशा बंदची हाक कोणी दिली असती तरी तो पाळला गेला असता आणि त्या बंदला गुरूवार एवढाच किंबहुना त्यापेक्षाही जास्त पाठिंबा मिळाला असता.याचं कारण असं की रायगड जिल्ह्यातील जनता दरोडखोरांच्या उपद्रवाला कमालिची वैतागली आहे. जिल्ह्यात दरोडेखोरांनी जो उच्छाद मांडला आहे तो बघता आपण महाराष्ट्रांतच राहतो आहोत की,युपीत राहतो आहोत असा प्रश्न रायगडच्या जनतेला पडलेला आहे.जिल्ह्यातील दरोडयाची सहा महिन्यांची आकडेवारी बघितली तर किमान पंधरा-वीस तरी मोठे दरोडे जिल्ह्यात पडले आहेत.पनवेलपासून त्याला सुरूवात झाली.रसायनीत एकाच रात्रीत दरोडेखोरांनी भरबाजारपेठेतील सहा दुकाने फोडून पोलिस यंत्रणेला आव्हान दिलं .रसायनीतल्या दरोड्यांचा अजून तपासही लागला नाही तोच दरोडेखोरांनी पेणला दरोडे टाकले.त्यानंतर सुधागड-पालीत दरोडे टाकून एकाच रात्री बारा दुकानं फोडली.तेथून नंतर बिरवाडीत दरोडा टाकला गेला.तिथं एकाच रात्रीत तीन घरं फोडली.या दरोड्यात एका मुलीला ठार करण्यात आलं.नंतर पोलादपूरमध्येही दरोडे पडले.तिथंही दरोडेखोरांनी एकास ठार केले.छोट्या-मोठ्या चोऱ्या तर गावोगाव झालेल्या आहेत.दिवेआगरमधील मूर्ती चोरीस गेल्यानं मुद्दा गवसला म्हणून खुषीत असलेल्या शिवसेनेला याची कल्पना नसावी की,गेल्या दोन-तीन वर्षातला जिल्ह्याचा रेकॉर्ड तपासला तर मंदिरातील चोऱ्यांच्या किमान पाच-पंचवीस तरी घटना घडलेल्या आहेत.मंदिरातील घंटीच चोरीस जा,मंदिरा समोरील दान पेटीच पळविली जा,मूर्तीच्या अंगावरील चीज वस्तू लंपास कर,अशा घटना रायगडवासियांना आता नव्या राहिलेल्या नाहीत.घऱफोड्या आणि मंदिरात होणाऱ्या चोऱ्यांमुळे जिल्ह्यातील जनता त्रस्त आहे.परिणामतः पोलिसांवर विसंबून न राहता गावकऱ्यांनी गावात गस्ती सुरू केलेल्या आहेत.त्यातून रात्रीच्या वेळेस गावात अनोळखी दिसणाऱ्या व्यक्तींना गस्तीवरील गावकऱ्यांनी ठार केल्याच्या काही घटनाही घडलेल्या आहेत.या संदर्भात पनवेल तालुक्यातील वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरढोन गावातील उदाहऱण देता येईल. काही दिवसांपूर्वी तिथं रात्रीच्या वेळेस असाच एकाचा मडदा पाडला गेला.त्यात गावकऱ्यांची चूक आहे असं म्हणता येणार नाही चोरट्यांनी जिल्हयात कमालीची दहशत निर्माण केलेली आहे,त्यातूनच हा प्रकार घडला.रात्रीच्या वेळेस गावात दिसणाऱ्या अनोळखी लोकांना मारहाण झाल्याच्या घटना अलिबाग आणि अन्य तालुक्यातही घडलेल्या आहेत.या सर्व घटना रायगड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती किती रसातळाला गेलेली आहे हे दाखविणाऱ्या आहेत.चोऱ्या होत होत्या ,माणसं मारली जात होती तेव्हा कोणत्याही पक्षानं याबाबत जिल्हा प्रशासनाला जाब विचारला नाही किंवा मार्चा काढून आपला संतापही व्यक्त केला नाही.राज्याची राजधानी असलेल्या मुंबईच्या जवळ असणाऱ्या छत्रपतींच्या या जिल्हयात अचानक दरोड्याच्या घटना वाढल्या का? असा प्रश्नही विचारण्याची कोणाला गरज वाटली नाही. पोलिसांनीही दरोड्यांचं हे सत्र थांबावं यासाठी काही ठोस पाऊले उचललीत असं झालं नाही.त्यामुळं जनतेला कोणी वाली उरला नव्हता.माध्यमातून एक दिवस बातम्या यायच्या. तेवढ्या पुरती चर्चा व्हायची. दुसऱ्या दिवशी नंतरचा दरोडा पडेपर्यत सारे शांत व्हायचे.संतापाची गोष्ट अशी की,रायगड जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात जेवढे म्हणून दरोडे पडले, त्यातील बहुतेक दरोड्यातील चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपय़श आलं आहे. त्यामुवळं दिवेआगर घटनेतील आरोपी सापडले जातील यावर कोणाचा विश्वास नाही.‘तपास योग्य दिशेनं सुरू आहे ’ या घोकमपट्टी करीत पाठ करून ठेवलेल्या पुढारीछाप विधानावरही कोणाचा विश्वास राहिलेला नाही. या अविश्वासाला कारण ठरली आहे ती पोलिसांची निष्क्रीयता . कोणताही दरोडा पोलिसांनी गांभीर्यानं घेतला आहे आणि पुन्हा दरोडा पडणार नाही यासाठी काही उपाय योजिले आहेत असं झालच नाही.दरोडे पडून माणसं मारली गेल्यावरही त्या घटनांची जेवढया गांभीर्यानं दखल घ्यायला हवी होती तेवढ्या गांभीर्यानं ती घेतली न गेल्यानं आता दरोडेखोर काणत्या गावात दरोडा टाकणार याचे अंदाज बांधित बसण्याशिवाय जनतेच्या हाती काहीच उरले नव्हते.अखेर रायगड जिल्ह्यातील जनतेला बाप्पाच पावले म्हणायचे.कारण दिवेआगर मंदिरातील गणेश मूर्ती चोरली गेल्यामुळं तरी शिवसेनेचे या विषयाकडं लक्ष गेलं आणि रायगडमधील वाढत्या चोऱ्या आणि दरोड्यांची राज्यात चर्चा सुरू झाली.अपेक्षा अशी होती की,हा विषय केवळ चर्चे पुरताच मर्यादित न राहता त्यावर परिणामकारक उपाययोजना व्हावी.दुर्दैवानं तसं होताना दिसत नाही.कारण गणेश मूर्ती चोरी प्रकरण आता केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय राहिले नाही.चोरीला धार्मिक आणि भावनेचा मुलामा देत त्याचं राजकारण सुरू झालं आहैे.त्यामुळं रायगडकर गेली सहा-आठ महिने ज्या प्रश्नामुळं घायकुतीला आले आहेत तो दरोड्याचा विषय सुटेल अशी शक्यता दिसत नाही.शुक्रवारी तर विधान भवनातील सेना-भाजपच्या १४ सदस्यांना निलंबित करण्यात आल्यानं मूळ गणेश मूर्ती चोरीच्या प्रश्नाला शंभर फाटे फुटले आहेत.चर्चा राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थितीवर व्हायला हवी होती.वाहिन्यावर आता चर्चा सुरू आहे ती,निलंबन योग्य की अयोग्य याच विषयावर.ही चर्चा आणि विषय असाच भरकटत जाणार आणि रायगड जिल्ह्यातील दरोड्याचा मूळ मुद्दा बाजूलाच पडणार हे वगऴं सांगायला नकोच.शुक्रवारी दिवसभर आऱती आणि गणेशाच्या घोषणाच्या गोंधळात तपास कुठपर्यत आला आहे यावर चर्चा झालीच नाही.शिवसेनेच्या आरतीनं सरकारचे दोन फायदे झाले.एक म्हणजे गणेशमूर्तीच्या चोरी तपासाचं काय झालं ?,आठ दिवस झाले तरी तपास का लागत नाही? रायगडमध्ये चोऱ्या का वाढल्या आहेत? रायगडमध्ये गेल्या चार वर्षांपासून एकच एस.पी.कसे आणि का ठाण मांडून बसले आहेत?त्यांना कोणाचे आशीर्वाद आहेत ?असे प्रश्न कोणी विचारलेच नाहीत.म्हणून या प्रश्नांची उत्तर देण्याची वेळही सरकारवर आली नाही. शिवाय दिवेआगर येथे पूर्वी मूर्तीच्या संरक्षणासाठी चार शस्त्रधारी पोलीस असायचे.ते पोलीस संरक्षण अचानक काढून घेतले गेले.५० ते ५५ लाख रूपयांची मूर्ती उघड्यावर आहे.तिची चोरी होऊ शकते,असं झालं तर लोकभावनाही प्रक्षुब्ध होउ शकतात याची काळजी संरक्षण काढून घेताना सरकारला का वाटली नाही आणि मुळात संरक्षण कोणाच्या सूचनेवरून आणि का काढले ? असे प्रश्न विचारून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं असतं तर सरकारची बोबडी वळली असती.चोरी प्रकरणी गंभीरपणे चर्चा झाली असती तर ‘देवा तुला शोधू कुठं ’ असं म्हणत भजन गाण्याची वेळ विरोधकांवर नव्हे तर सरकारवर आली असती.शिवसेनेच्या गोंधळामुळं सरकार त्यातून वाचलं.शिवाय शुक्रवारी भ्रष्टाचाराच्या मुद्यावर जी चर्चा व्हायची होती ती ही झाली नाही.कृपाशंकर सिंह यांनी जमविलेली बेहिशोबी माया आणि एकूणच भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून विरोधक सरकारला धारेवर धरणार होतें.तसं झालंच नाही. महागाई,गॅसची दरवाढ आणि गॅस टंचाई तसेच राज्यातील पाणी टंचाई हे आणि असेच लोकांच्या जीवनमरणाशी निगडीत असलेले अनेक विषय बाजूला ठेवून विरोधकांनी एका मूर्तीच्या चोरीवरून एक दिवस वाया घालविला. त्याचं खापर आता विरोधक सरकारवर फोडत आहेत.ते चुकीचं आहे.कारण आरती सुरू झाल्यावर दोन वेळा सभागृहाचं कामकाज तहकूब केलं गेलं होतं. तेव्हाच आरती आणि टाळ कुटणं थांबवित या विषयावर चर्चेची मागणी लावून धरली असती तर विषयांतर करण्याची जी संधी नंतर सरकारला मिळाली ती मिळाली नसती.म्हणजे सरकारला जे हवं तेच घडलं . त्याला सत्ताधारी नव्हे तर शिवसेनाच जबाबदार आहे असं म्हणावं लागेल.गणेश मूर्ती चोरी हा विषय केवळ कायदा आणि सुव्यस्थेशी निगडीत आहे.त्याला भावनिक मुलामा देण्याचं कारण नाही. विषय देवांच्या सुरक्षिततेचाच असेल तर मग देव कुठलेच सुरक्षित नाहीत.साईबाबांना हितसंबंधियांच्या तावडीतून वाचविण्याचा प्रयत्न हाय कोर्टानं दोन वेळा केला तरी त्याचा उपयोग होताना दिसत नाही.पंढरीचा पांडूरंग असेल,कोल्हापूरची अंबाबाई असेल किंवा अन्य मंदिरं असतील तिथं भक्तांपेक्षा लुटारूंचाच गराडा जास्त पडलेला आहे.शिवाय चोरट्यांना देवाचं भय असण्याचं कारण नाही. कारण ज्यांचं भय वाटावं त्या पोलिसांचं चारट्यांना भय उरलं नसेल तर कल्पनेतील देवाला ते घाबरतील अशी स्थिती नाही .त्यामुळंच चोरट्यांना कायद्याचं भय वाटावं असं काही करण्याची गरज असताना आणि त्यासाठी शंखनाद होणे अपेक्षित असताना सेना भलत्याच गोष्टीवर जोर देत असल्यानं लोकांना सेनेचा हा केवळ राजकीय स्टंट वाटतो आहे.चोरटयांनी केलेले हे कृत्य लोकभावना दुखविणारे आहे असं खरोखरच सेनेला वाटत असेल तर सेना आमदारांनी स्टंटबाजी सोडून राज्यातील एकूणच कायदा आणि सुव्यवस्था परस्थितीवर गंभीरपणे चर्चा करून सरकारला काही निर्णय घेण्यास भाग पाडायला हवे होते.शिवसेनेने ही संधी दवडली आणि स्वतःच्या हातानं कारवाई ओढवून घेतली.शिवसेनेने जो मुद्दा हाती घेतलाय त्यात काही दम नाही हे भाजपच्या लक्षात आल्यावर शिवसेनेच्या आऱती कार्यक्रमात भाजपनं भाग घेतला नाही.भाजपवाले तटस्थ राहिले.धर्माचं राजकारण करण्यात आपल्या पेक्षा भाजप जास्त पटाईत असताना तो गप्प का याचा विचार जरी शिवसेनेने केला असता तरी त्यांचे १३ आमदार वर्षासाठी निलंबित झाले नसते.ते निलंबित झाले याचं आम माणसाला काहीच वाटलं नाही.याचं कारण ते लोकांच्या प्रश्नासाठी लढत असताना निलंबित झालेले नाहीत तर भावनेचं राजकारण करताना त्यांना सत्ताधाऱ्यांनी हिसका दाखविला आहे हे लोकांना समजले आहे.कोणत्या विषयावर लोकांचा पाठिंबा मिळू शकतो आणि कोणत्या नाही हे उध्दव ठाकरे यांच्या लक्षात येत नाही नाही काय? दिसतंय तरी तसंच.लोकांना गणपतीच्या रक्षणापेक्षा स्वतःचं रक्षण महत्वाचं वाटतं.मूर्ती किंवा मंदिरांच्या रक्षणापेक्षा जित्या-जागत्या माणसांचं रक्षण मलाही महत्वाचं वाटतं. सामांन्य माणसाला निवांतपणे त्याचं आयुष्य जगता यावं यासाठी उध्दव ठाकरे काही बोलत नाहीत,सरकारला धारेवर धरत नाहीत आणि सरकारही काही करीत नाही ही खरी जनतेची शोकांतिका आहे .कायदा आणि सुव्यवस्था स्थिती किती रसातळाला गेलेली आहे हे दाखविणाऱ्या आहेत.चोऱ्या होत होत्या ,माणसं मारली जात होती तेव्हा कोणत्याही पक्षानं याबाबत जिल्हा प्रशासनाला जाब विचारला नाही किंवा मार्चा काढून आपला संतापही व्यक्त केला नाही.राज्याची राजधानी असलेल्या मुंबईच्या जवळ असणाऱ्या छत्रपतींच्या या जिल्हयात अचानक दरोड्याच्या घटना वाढल्या का? असा प्रश्नही विचारण्याची कोणाला गरज वाटली नाही. पोलिसांनीही दरोड्यांचं हे सत्र थांबावं यासाठी काही ठोस पाऊले उचललीत असं झालं नाही.त्यामुळं जनतेला कोणी वाली उरला नव्हता.माध्यमातून एक दिवस बातम्या यायच्या. तेवढ्या पुरती चर्चा व्हायची. दुसऱ्या दिवशी नंतरचा दरोडा पडेपर्यत सारे शांत व्हायचे.संतापाची गोष्ट अशी की,रायगड जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात जेवढे म्हणून दरोडे पडले, त्यातील बहुतेक दरोड्यातील चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपय़श आलं आहे. त्यामुवळं दिवेआगर घटनेतील आरोपी सापडले जातील यावर कोणाचा विश्वास नाही.‘तपास योग्य दिशेनं सुरू आहे ’ या घोकमपट्टी करीत पाठ करून ठेवलेल्या पुढारीछाप विधानावरही कोणाचा विश्वास राहिलेला नाही. या अविश्वासाला कारण ठरली आहे ती पोलिसांची निष्क्रीयता . कोणताही दरोडा पोलिसांनी गांभीर्यानं घेतला आहे आणि पुन्हा दरोडा पडणार नाही यासाठी काही उपाय योजिले आहेत असं झालच नाही.दरोडे पडून माणसं मारली गेल्यावरही त्या घटनांची जेवढया गांभीर्यानं दखल घ्यायला हवी होती तेवढ्या गांभीर्यानं ती घेतली न गेल्यानं आता दरोडेखोर काणत्या गावात दरोडा टाकणार याचे अंदाज बांधित बसण्याशिवाय जनतेच्या हाती काहीच उरले नव्हते.अखेर रायगड जिल्ह्यातील जनतेला बाप्पाच पावले म्हणायचे.कारण दिवेआगर मंदिरातील गणेश मूर्ती चोरली गेल्यामुळं तरी शिवसेनेचे या विषयाकडं लक्ष गेलं आणि रायगडमधील वाढत्या चोऱ्या आणि दरोड्यांची राज्यात चर्चा सुरू झाली.अपेक्षा अशी होती की,हा विषय केवळ चर्चे पुरताच मर्यादित न राहता त्यावर परिणामकारक उपाययोजना व्हावी.दुर्दैवानं तसं होताना दिसत नाही.कारण गणेश मूर्ती चोरी प्रकरण आता केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय राहिले नाही.चोरीला धार्मिक आणि भावनेचा मुलामा देत त्याचं राजकारण सुरू झालं आहैे.त्यामुळं रायगडकर गेली सहा-आठ महिने ज्या प्रश्नामुळं घायकुतीला आले आहेत तो दरोड्याचा विषय सुटेल अशी शक्यता दिसत नाही.शुक्रवारी तर विधान भवनातील सेना-भाजपच्या १४ सदस्यांना निलंबित करण्यात आल्यानं मूळ गणेश मूर्ती चोरीच्या प्रश्नाला शंभर फाटे फुटले आहेत.चर्चा राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थितीवर व्हायला हवी होती.वाहिन्यावर आता चर्चा सुरू आहे ती,निलंबन योग्य की अयोग्य याच विषयावर.ही चर्चा आणि विषय असाच भरकटत जाणार आणि रायगड जिल्ह्यातील दरोड्याचा मूळ मुद्दा बाजूलाच पडणार हे वगऴं सांगायला नकोच.शुक्रवारी दिवसभर आऱती आणि गणेशाच्या घोषणाच्या गोंधळात तपास कुठपर्यत आला आहे यावर चर्चा झालीच नाही.शिवसेनेच्या आरतीनं सरकारचे दोन फायदे झाले.एक म्हणजे गणेशमूर्तीच्या चोरी तपासाचं काय झालं ?,आठ दिवस झाले तरी तपास का लागत नाही? रायगडमध्ये चोऱ्या का वाढल्या आहेत? रायगडमध्ये गेल्या चार वर्षांपासून एकच एस.पी.कसे आणि का ठाण मांडून बसले आहेत?त्यांना कोणाचे आशीर्वाद आहेत ?असे प्रश्न कोणी विचारलेच नाहीत.म्हणून या प्रश्नांची उत्तर देण्याची वेळही सरकारवर आली नाही. शिवाय दिवेआगर येथे पूर्वी मूर्तीच्या संरक्षणासाठी चार शस्त्रधारी पोलीस असायचे.ते पोलीस संरक्षण अचानक काढून घेतले गेले.५० ते ५५ लाख रूपयांची मूर्ती उघड्यावर आहे.तिची चोरी होऊ शकते,असं झालं तर लोकभावनाही प्रक्षुब्ध होउ शकतात याची काळजी संरक्षण काढून घेताना सरकारला का वाटली नाही आणि मुळात संरक्षण कोणाच्या सूचनेवरून आणि का काढले ? असे प्रश्न विचारून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं असतं तर सरकारची बोबडी वळली असती.चोरी प्रकरणी गंभीरपणे चर्चा झाली असती तर ‘देवा तुला शोधू कुठं ’ असं म्हणत भजन गाण्याची वेळ विरोधकांवर नव्हे तर सरकारवर आली असती.शिवसेनेच्या गोंधळामुळं सरकार त्यातून वाचलं.शिवाय शुक्रवारी भ्रष्टाचाराच्या मुद्यावर जी चर्चा व्हायची होती ती ही झाली नाही.कृपाशंकर सिंह यांनी जमविलेली बेहिशोबी माया आणि एकूणच भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून विरोधक सरकारला धारेवर धरणार होतें.तसं झालंच नाही. महागाई,गॅसची दरवाढ आणि गॅस टंचाई तसेच राज्यातील पाणी टंचाई हे आणि असेच लोकांच्या जीवनमरणाशी निगडीत असलेले अनेक विषय बाजूला ठेवून विरोधकांनी एका मूर्तीच्या चोरीवरून एक दिवस वाया घालविला. त्याचं खापर आता विरोधक सरकारवर फोडत आहेत.ते चुकीचं आहे.कारण आरती सुरू झाल्यावर दोन वेळा सभागृहाचं कामकाज तहकूब केलं गेलं होतं. तेव्हाच आरती आणि टाळ कुटणं थांबवित या विषयावर चर्चेची मागणी लावून धरली असती तर विषयांतर करण्याची जी संधी नंतर सरकारला मिळाली ती मिळाली नसती.म्हणजे सरकारला जे हवं तेच घडलं . त्याला सत्ताधारी नव्हे तर शिवसेनाच जबाबदार आहे असं म्हणावं लागेल.गणेश मूर्ती चोरी हा विषय केवळ कायदा आणि सुव्यस्थेशी निगडीत आहे.त्याला भावनिक मुलामा देण्याचं कारण नाही. विषय देवांच्या सुरक्षिततेचाच असेल तर मग देव कुठलेच सुरक्षित नाहीत.साईबाबांना हितसंबंधियांच्या तावडीतून वाचविण्याचा प्रयत्न हाय कोर्टानं दोन वेळा केला तरी त्याचा उपयोग होताना दिसत नाही.पंढरीचा पांडूरंग असेल,कोल्हापूरची अंबाबाई असेल किंवा अन्य मंदिरं असतील तिथं भक्तांपेक्षा लुटारूंचाच गराडा जास्त पडलेला आहे.शिवाय चोरट्यांना देवाचं भय असण्याचं कारण नाही. कारण ज्यांचं भय वाटावं त्या पोलिसांचं चारट्यांना भय उरलं नसेल तर कल्पनेतील देवाला ते घाबरतील अशी स्थिती नाही .त्यामुळंच चोरट्यांना कायद्याचं भय वाटावं असं काही करण्याची गरज असताना आणि त्यासाठी शंखनाद होणे अपेक्षित असताना सेना भलत्याच गोष्टीवर जोर देत असल्यानं लोकांना सेनेचा हा केवळ राजकीय स्टंट वाटतो आहे.चोरटयांनी केलेले हे कृत्य लोकभावना दुखविणारे आहे असं खरोखरच सेनेला वाटत असेल तर सेना आमदारांनी स्टंटबाजी सोडून राज्यातील एकूणच कायदा आणि सुव्यवस्था परस्थितीवर गंभीरपणे चर्चा करून सरकारला काही निर्णय घेण्यास भाग पाडायला हवे होते.शिवसेनेने ही संधी दवडली आणि स्वतःच्या हातानं कारवाई ओढवून घेतली.शिवसेनेने जो मुद्दा हाती घेतलाय त्यात काही दम नाही हे भाजपच्या लक्षात आल्यावर शिवसेनेच्या आऱती कार्यक्रमात भाजपनं भाग घेतला नाही.भाजपवाले तटस्थ राहिले.धर्माचं राजकारण करण्यात आपल्या पेक्षा भाजप जास्त पटाईत असताना तो गप्प का याचा विचार जरी शिवसेनेने केला असता तरी त्यांचे १३ आमदार वर्षासाठी निलंबित झाले नसते.ते निलंबित झाले याचं आम माणसाला काहीच वाटलं नाही.याचं कारण ते लोकांच्या प्रश्नासाठी लढत असताना निलंबित झालेले नाहीत तर भावनेचं राजकारण करताना त्यांना सत्ताधाऱ्यांनी हिसका दाखविला आहे हे लोकांना समजले आहे.कोणत्या विषयावर लोकांचा पाठिंबा मिळू शकतो आणि कोणत्या नाही हे उध्दव ठाकरे यांच्या लक्षात येत नाही नाही काय? दिसतंय तरी तसंच.लोकांना गणपतीच्या रक्षणापेक्षा स्वतःचं रक्षण महत्वाचं वाटतं.मूर्ती किंवा मंदिरांच्या रक्षणापेक्षा जित्या-जागत्या माणसांचं रक्षण मलाही महत्वाचं वाटतं. सामांन्य माणसाला निवांतपणे त्याचं आयुष्य जगता यावं यासाठी उध्दव ठाकरे काही बोलत नाहीत,सरकारला धारेवर धरत नाहीत आणि सरकारही काही करीत नाही ही खरी जनतेची शोकांतिका आहे
-एस.एम.देशमुख
|