A Leading E-Newspaper from Osmanabad....
     
 
 
सडेतोड
 
 
सत्य आणि रोखठोक
(Updated on 04/04/2013 13 : 14 IST)
 
आम्ही सत्य आणि रोखठोक लिहितो म्हणून उस्मानाबादच्या काही तथाकथित पत्रपंडितांमध्ये पोटशूळ उठले आहे. काहींच्या दुकानदा-या आम्ही बंद केल्या आहेत.म्हणून आम्हाला काहीजण पाण्यात पहात असतात.
मी आयुष्यात कधीच दारू पित नाही. नॉनव्हेज मला आवडत नाही. मावा,गुटखा,सिगारेट आदी व्यसनापासून दूर आहे.रात्री कोणाच्या पार्टीला जात नाही.मग पार्टीसाठी जावून मार खाणारे आमची मागे टिंगल टवाळी करीत असतात.दुस-याकडे एक बोट दाखविताना स्वत:कडे चार बोटे असतात,याचा त्यांना विसर पडतो. दुस-याचे कुसळ दिसते, मात्र स्वत:चे मुसळ दिसत नाही.अशा माकडछाप पत्रपंडितांकडे आम्ही लक्ष देत नाही.
मी आजपर्यंत कोणत्याही पत्रकाराचे बॅनर म्हणजे वृत्तपत्र काड्या करून हाती घेतले नाही.प्रत्येक वेळी मी नविन बॅनर आणले आहे. एकमत,सह्याद्री, केसरी, लोकसत्ता, लोकाशा,सोलापूर सुराज्य, लोकशासन असे किती तरी नविन बॅनर आणले. मी बॅनर आणायचे, ते लोकप्रिय करायचे मात्र काडीमास्तर पत्रपंडितांनी गुप्त काड्या करून माझे बॅनर काढून घ्यायचे हा सिलसिला नवा नाही. हलक्या कानाचे मालक आणि धंदेवाईक संपादक असल्यानंतर दुसरे काय होणार.
मग मीच माझे बॅनर तयार केले. त्याचे नाव आहे - उस्मानाबाद लाइव्ह. हे बॅनर तर कोणी काढून घेवू शकत नाही...अडीच वर्षे झाली, अखंडपणे आमची लेखणी तळपत आहे. मध्यंतरी आम्ही पत्नीच्या निधनामुळे दु:खी होतो. बाहेरची अनेक संकटे कोसळली पण कधी डगमगलो नाही, पण देवाने माझ्यावर घरचे संकट टाकल्यामुळे एक ते दीड वर्षे खचलो होतो.मात्र पुन्हा नव्या दमाने लेखणी सुरू केली आहे.
आम्ही जे सत्य आहे,ते सडेतोड मांडतो. जनतेची बाजू घेतो, नेत्यांनी नाही. जे खिसेभरू असतात,तेच नेत्यांची तळी उचलत असतात. ते काय आणि कसे लिहितात, हाही संशोधनाचा विषय आहे.त्यांनी स्वत:च्या पोटापाण्यासाठी लेखणी हाती घेतली आहे, आम्ही नाही.मी पत्रकारिता जॉब म्हणून नाही, एक चळवळ म्हणून करतो.
माझ्या सुदैवाने १३ राज्यात ३६ आवृत्त्या असलेल्या भास्करमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. औरंगाबादहून भास्कर सुरू होवून, दीड वर्षे झाली,तेव्हापासून काम करतो, पण कधी प्रपोगंडा केला नाही. उस्मानाबाद लाइव्ह हेच माझे खरे बॅनर आहे आणि ते कायम राहणार.मग असे कितीही तथाकथित पत्रपंडित जळफळाट करो...

..................................
राजकीय पुढा-यांच्या संगतीत राहून पत्रकार राजकारणी झाले आहेत. उस्मानाबादला दोन वेगवेगळे संघ झाले आहेत.त्यातही दोन्ही संघात दोन गट आहेत. मुख्य उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघात बोटावर मोजण्याऐवढेच खरे पत्रकार उरले आहेत. ज्यांना चार ओळी लिहिता येत नाही, ऑफीसमध्ये शिपाई काम करतो,अशांना सदस्य करण्यात आले आहे.जे खरे पत्रकार आहेत,पण त्यांच्या विरोधात आहेत,त्यांना सदस्य केले गेले नाही. मुदत संपूण सहा महिने झाले तरी निवडणुक नाही.मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधावी अशी परिस्थिती आहे. काही विशिष्ठ लोकांची मक्तेदारी आहे. मोर्चेबांधणी करून संघाच्या बिल्डींगमध्ये गेस्टरूममध्ये बि-हाड ठोकणा-यांना धक्के मारत बाहेर काढण्यात आले.दुस-यासाठी खड्डे खंदले की, एक दिवस स्वत: पडणार हे नक्की आहे.यांचे गटातटाचे भांडण,तंटे, व्देष आणि इर्षा पाहून मी गेल्या दोन वर्षापासून तटस्थ आहे. जवळच बसून पाठीत खंजीर खुपसणारे कमी नाहीत.
उस्मानाबादच्या एका बांग्या पत्रकारांने चार - पाच वर्षापुर्वी न्यास नोंदणी कार्यालयात उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघ नोंदणी करण्याचा प्रयत्न केला होता.या प्रस्तावासोबत १०० रूपयाच्या स्टॅम्प पेपरवर जे शपथपत्र देण्यात आले होते, त्यात नमूद केले होते की, या संघाकडे कसलीच पॉपर्टी नाही.वास्तविक संघाची इमारत आहे, सांजा रोडवर १ कोटीचा भुखंड आहे, बॅकेत ठेवी आहेत.खोटे शप्पथपत्र दिले म्हणून मी त्याच्यावर ४२० चा खटला दाखल केला होता. त्यानंतर हा प्रस्ताव फेटाळला गेला. त्यानंतर सांजा रोडवरील भुखंड विकण्याचा प्रयत्न करण्यात आला.प्रत्यक्षात ८० लाखाला विकूण ५५ लाखात विकल्याचे कारस्थान करण्यात आले होते.शेठजी,बांग्या आणि त्याच्या बापाचा हा डाव भारत गजेंद्रगडकर,राजेंद्र बहिरे आणि मी उधळून लावला. मी सत्य वागतो, म्हणून बांग्या,त्याचा बाप त्याच्या ढुंगण पुसायच्या पेपरमध्ये सतत खोट्या बातम्या छापतो.सुर्यावर थुंकले म्हणून सुर्याचे तेज कधी कमी होत नाही.लबाड लांडग्याविरूध्द माझा लढा कायमच राहील.
................
उस्मानाबादच्या शेठजीचे सध्या दिवस फिरले आहेत. दर्डा शेठचा पेपरमध्ये असताना काय - काय कारनामे केले, आणि सध्या म.टा.च्या नावाखाली काय उद्योग चालू आहे याचा इतिहास कधी तरी सवडीने लिहू.दर्डा शेठचा पेपर गेल्यानंतर शेठजींना आता दुसरा झटका बसला आहे. या शेठजीचे उस्मानाबादच्या बस स्टॅन्डवर बुक स्टॉल होते.या बुक स्टॉलला एस.टी.महामंडळाने पंधरा दिवसापुर्वी टाळे ठोकले आहे.त्याची चार ओळीची बातमी अजून कोठे छापून आली नाही.लोक आम्हाला विचारतात, का हो, ही बातमी अजून कशी काय आली नाही.शेठजीच्या ढुंगणाजवळ बसणारेही आम्हाला फोन करून सांगतात, तुम्हाला कळले का...पण स्वत: काही चार ओळीची बातमी लिहिणार नाहीत.
असो, या शेठजीचे बस स्टॅन्डवर गेल्या २५ वर्षापेक्षा जास्त काळापासून बुक स्टॉल होते. त्याचा करार सात वर्षापुर्वीच संपला होता. जेव्हा करार संपला,तेव्हा एस.टी.महामंडळाने या दुकानासाठी निविदा मागितल्या.त्यातून हे बुक स्टॉल राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पवार याला गेले आहे. मात्र शेठजी कोर्टात गेले.स्थगिती घेतली.सात वर्षानंतर कोर्टाचा निकाल शेठजीच्या विरोधात गेला.मात्र शेठजीचे स्टॉल चालूच होते.पंधरा दिवसांपुर्वी मग एस.टी.महामंडळाने टाळे ठोकले आहे.
शेठजी आपले बि-हाड गुंडाळण्यास तयार नाहीत.आता शेवटची आठ दिवसाची मुदत देण्यात आली आहे.शेठजीने गुमान सामान खाली केले नाही तर सामान जप्त होणार आहे.एखाद्याने कोर्टाचा निकाल लागल्यानंतर लगेच सामान खाली केले असते. कोर्टाच्या निकालाचा हा अवमान नव्हे का...
या बुक स्टॉलवर मागे वृत्तपत्राबरोबर अश्लिल पुस्तके विकत असल्याबद्दल रेड पडली होती.नितिमत्तेचे धडे देण्याचा शेठजीना काय अधिकार आहे...
पालकमंत्र्यांचे पी.ए.- जाधव यांना जाहिरातीच्या नावाखाली कसा गंडा घातला,हे जगजाहीर आहे.शेठजींनी आता दुस-याविरूध्द काड्या करने थांबवावे.पत्रकारितेचा दंडुका दाखवून गुरगुर करणे सोडावे.अन्यथा मागे सुरज साळुंकेंच्या मुलांनी जसे मुस्कटात लगावले तशी पुन्हा पाळी येईल.
जाता जाता या शेठजीचा किस्सा सांगतो, हे शेठजी औषध संघटनेत होते. जनावरांची औषधे विकणारे शेठजी माणसांची औषध विकणा-या संघटनेत असल्याचे पाहून अनेकांना आश्चर्य वाटायचे. एका औषध विक्रेत्याने म्हणे बारमध्ये दारू पिऊन गोंधळ घातला.त्याची बातमी सुनील ढेपे छापणार असल्याची भिती दाखवून शेठजींना त्यांना ब्लॅकमेल केले.मला यातील गंधही माहीत नव्हते.मला शेठजीचा फोन आला, अमक्या अमक्याचा फोन आला तर बातमी देणार म्हणून सांगा.मला त्यातील काहीही माहीत नव्हते.ढुंगणात बसणा-याने सांगितले की, शेठजीेने तुमच्या नावाखाली त्याच्याकडून मोठी रक्कम उकळली.मग माझे मस्तक हालले.तेव्हापासून या शेठजीचे काळे धंदे उघडकीस आणणे सुरू केले.
स्वत:च्या नावावर खत विकायचे सोडून दुस-याच्या नावावर खत विकणे योग्य आहे का शेठजी...या शेठजीच्या पेकाटात लाथ घालू नये तर काय करावे ?
 
 
  संबंधित बातम्या
सत्य आणि रोखठोक  
दुसरा वर्धापनदिन...  
न केलेले गुन्हे  
सकाळची माणुसकी हरवली...  
मागे वळून पाहताना  
सत्य परेशान हो सकता है...  
सत्यमेव जयते...!  
विळ्या - भोपळ्याची मोट  
चिवरीची अघोरी प्रथा...  
पत्रकारितेचा प्रवास....  
संजयजी...तिसरा डोळा उघडा !  
नवा उत्साह, नवा जोश...!  
 
   
A Leading E-Newspaper from Osmanabad....
सर्व हक्क सुरक्षित. कॉपीराईट 2010. Powerd by :