A Leading E-Newspaper from Osmanabad....
     
 
 
ताज्या बातम्या
 
 
पाकिस्तानात ‘नवाझ’ राज
(Updated on 12/05/2013 18 : 55 IST)
 
इस्लामाबाद - पाकिस्तानात झालेल्या ऐतिहासिक निवडणूकीत माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ (पीएमएल- एन) पक्षाने बाजी मारली आहे.

२७२ सदस्यांच्या नॅशनल अँसेंबलीसाठी मतमोजणी सुरु असून, पीएमएल-एन १२५ पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर दुस-या स्थानासाठी माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांच्या चढाओढ सुरु आहे.

२७२ पैकी २६४ जागांवरील मतमोजणीचा कल पाहता पीएमएल- एनला १२५ पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. इम्रान खान यांचा पीटीआय आणि पीपीपी हे दोन्ही पक्ष पीएमएल- एनच्या जवळपासही नाहीत. सत्ताधारी पीपीपीचा या निवडणूकीत अत्यंत दारुण पराभव झाला आहे. अद्याप अधिकृतपणे विजयाची घोषणा करण्यात आली नसली तरी, नवाझ शरीफ यांनी विजय झाल्याचे जाहीर केले आहे.

६३ वर्षीय नवाझ शरीफ तिस-यांदा पाकिस्तानची सूत्रे संभाळणार असून, यापूर्वी दोनवेळा त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधानपद भूषविले आहे. विजयानंतर लाहोर येथे आपल्या समर्थकांना संबोधित करताना, नवाझ शरीफ यांनी पून्हा सत्ता मिळाल्याबद्दल अल्लाचे आभार मानले व देशाच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व पक्षांसोबत एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली. बेरोजगारी, महागाई आणि भारनियमन पाकिस्तान समोरील मुख्य आव्हाने असून, या समस्या सोडविण्याला आपले पहिले प्राधान्य असेल. आपण सर्वांना मिळून एकत्र काम करुया असे त्यांनी सांगितले.

सार्वत्रिक निवडणूकीत पक्षाला घवघवीत यश मिळाल्याने पीएमएल-एनच्या कार्यकर्त्यांचा संपूर्ण पाकिस्तानात जल्लोष सुरु आहे. शनिवारी मतदानाच्या दिवशी पाकिस्तानात सात बॉम्बस्फोट झाले. यात २९ जणांचा मृत्यू झाला तरीही, पाकिस्तानी जनतेने या दहशतवादाला शरण न जाता मोठया संख्येने मतदान केले. यात महिला मतदारांचा उत्साह विशेष लक्षवेधी होता.

संपूर्ण निवडणूक काळात तेहरीक-ए-तालिबान पक्षाने केलेल्या विविध दहशतवादी हल्ल्यात १५० हून कार्यकर्ते आणि उमेदवारांचा मृत्यू झाला. तालिबानने प्रामुख्याने धर्मनिरपेक्ष पक्षांना लक्ष्य केले. पाकिस्तानात झालेल्या भरघोस मतदानामुळे तेथील जनतेला लोकशाही हवी असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानात प्रथमच लोकनियुक्त सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर सत्तांतर होत आहे. यापूर्वीची अनेक सरकारे तेथील लष्कराने विशेषाधिकार वापरुन बर्खास्त केली आहेत.
 
 
  संबंधित बातम्या
कुपोषणमुक्तीसाठी १४ नोव्हेंबरपासून अभियान
मंत्रिमंडळ निर्णय
उध्दवराव मोळवणे यांचे आकस्मिक निधन
सहकार्याची भूमिका ठेवावी - मुख्यमंत्री
३,०२७ ग्रामपंचायतींसाठी २६ नोव्हेंबरला मतदान
बकरी ईदनिमित्त मुख्यमंत्र्यांचा संदेश
अंबाजोगाई साहित्य संमेलन २७ व २८ ऑक्टोबर रोजी
इलनाच्या अध्यक्षपदी परेश नाथ यांची फेरनिवड
औरंगाबादेत स्फोट; पाच वाहने खाक
१९ नोव्हेंबरपर्यंत शिष्यवृत्ती जमा होणार
शिक्षण व चांगले संस्कार ध्येयपूर्तीसाठी आवश्यक
औद्योगिकरणाचा फायदा स्थानिकांनाही व्हावा - चव्हाण
औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरु करणार -मुख्यमंत्री
देशातील एक आदर्श उद्योग पार्क बनविणार
गावनिहाय आराखडा तयार करावा - मुख्यमंत्री
अंबाजोगाई छायाचित्र स्पर्धा
औषधी वनस्पतीचे लागवडीसाठी अर्थसहाय्य
धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळयाची तयारी पुर्ण
म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी लवकरच निर्णय
उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी प्रवेशिका पाठवाव्यात
Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 - 40 Next
Records 41 to 60 of 1821
 
     
A Leading E-Newspaper from Osmanabad....
सर्व हक्क सुरक्षित. कॉपीराईट 2010. Powerd by :