A Leading E-Newspaper from Osmanabad....
     
 
 
ताज्या बातम्या
 
 
म.सा.प.चे शाळा कॉलेजांना आवाहन
(Updated on 22/06/2012 18 : 3 IST)
 
अंबाजोगाई- अंबाजोगाईच्या सर्व शाळा आणि कॉलेजेस मध्ये साहित्य मंडळे स्थापन करावीत असे अवाहन मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
अंबाजोगाई म.सा.प.च्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची बैठक अमर हबीब यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. भगवानराव शिंदे यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीला सर्व अकरा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. शालेय व महाविद्यालयीन विद्याथ्र्यांचा साहित्य चळवळीत सहभाग वाढावा म्हणून प्रत्येक शाळा व कॉलेजमध्ये साहित्य मंडळ स्थापन करण्यात यावे असे अवाहन या बैठकीत करण्यात आले. साहित्य मंडळाच्या नवनिर्वाचित पदाधिका-यांचा सत्कार १० सप्टेंबर रोजी म.सा.प.च्या मासिक मैफलीत करण्यात करण्यात येईल.
मासिक मैफलीचा वार्षिक कार्यक्रम
दर महिन्याच्या १० तारखेला संध्याकाळी सहा वाजता अंबाजोगाई नगर पालिकेच्या मिटिंग हॉलमध्ये साहित्याची मासिक मैफल होईल. ती सर्वांसाठी खुली राहील. या वर्षी चार भाषांच्या अभिजात साहित्याची ओळख करून देणारी व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत. जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याच्या दर १० तारखेला संस्कृत साहित्याविषयी अमृत महाजन बोलतील. ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात उर्दू कवितांविषयी प्रा. डॉ. अकीला गौस बोलतील. पुढील वर्षी जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यात प्रा. कांबळे हिन्दी कवितेविषयी विचार मांडतील तर एप्रिल, मे व जून महिन्यात डॉ. वैशाली गोस्वामी ह्या संत कवितेची ओळख करून देतील.असा कार्यक्रम ठरविण्यात आला आहे, अशी माहिती म.सा.प.चे अध्यक्ष अमर हबीब यांनी दिली.
दर महिन्याच्या कार्यक्रमाला कार्यकारिणीचा एक सदस्य प्रायोजक व संयोजक असेल. या कार्यक्रमांमध्ये सहभाग वाढविण्यासाठी संतराम कराड आणि किरण असरडोहकर यांची कमिटी नियुक्त करण्यात आली असून त्यांना त्या महिन्याचा संयोजक व प्रायोजक कार्यकारिणी सदस्य मदत करेल. अंबाजोगाई येथे दरमहा होणा-या कार्यक्रमातून अंबाजोगाईकरांची वैचारिक बैठक अधिक बळकट करण्याची दृष्टी आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
निमंत्रित सदस्य
प्रा.रंगनाथ तिवारी(पहिल्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे अध्यक्ष), डॉ.श्रीहरी नागरगोजे (पहिल्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष), बलभीम तरकसे (माजी संमेलनाध्यक्ष), विद्याधर पांडे(माजी स्वागताध्यक्ष) आणि सौ.मंदा देशमुख (म.सा.प.च्या अंबाजोगाई शाखेच्या माजी अध्यक्ष) या नावांना निमंत्रित सदस्य म्हणून कार्यकारिणीने मान्यता दिली.
 
 
  संबंधित बातम्या
राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी
उच्च शिक्षणाचा गुणात्मक विकास आवश्यक
पाकिस्तानात ‘नवाझ’ राज
नळेगाव एसटी स्फोट दारु गोळ्यामुळे
चित्रपट निर्मिती कार्यशाळेचे आयोजन
कुमार कदम यांना ’ शिवनेर’ कार पुरस्कार जाहीर
वडार समाजाच्या मागण्यांबाबत विचार करू - मुख्यमंत्री
वाढदिवस साजरा न करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय
कवी संमेलनासाठी न.प.अंदाज पत्रकात तरतूद
दुष्काळावर मात करण्यासाठी महत्वाचे निर्णय
मिश्र विवाह मेळावे, वर्ध्यात बैठक
विरोधकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी - मुख्यमंत्री
महालक्ष्मीच्या दागिन्याची मोजदाद
पेट्रोलमध्ये पुन्हा पावणेदोन रुपयांची वाढ
विकासाचा अजेंडा पुढे नेणारा अर्थसंकल्प
बाभळी बंधाराप्रकरणी राज्यातील जनतेचा विजय
अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्यांचं जीवन सुसह्य होईल
भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी रमेश पोकळे
महिलांची बँक सुरु होणार
रेल्वे अर्थसंकल्पात सुधारणा सूचवण्याची गरज
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 - 40 Next
Records 1 to 20 of 1823
 
     
A Leading E-Newspaper from Osmanabad....
सर्व हक्क सुरक्षित. कॉपीराईट 2010. Powerd by :