A Leading E-Newspaper from Osmanabad....
     
 
 
ताज्या बातम्या
 
 
पाकिस्तानात ‘नवाझ’ राज
(Updated on 12/05/2013 18 : 55 IST)
 
इस्लामाबाद - पाकिस्तानात झालेल्या ऐतिहासिक निवडणूकीत माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ (पीएमएल- एन) पक्षाने बाजी मारली आहे.

२७२ सदस्यांच्या नॅशनल अँसेंबलीसाठी मतमोजणी सुरु असून, पीएमएल-एन १२५ पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर दुस-या स्थानासाठी माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांच्या चढाओढ सुरु आहे.

२७२ पैकी २६४ जागांवरील मतमोजणीचा कल पाहता पीएमएल- एनला १२५ पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. इम्रान खान यांचा पीटीआय आणि पीपीपी हे दोन्ही पक्ष पीएमएल- एनच्या जवळपासही नाहीत. सत्ताधारी पीपीपीचा या निवडणूकीत अत्यंत दारुण पराभव झाला आहे. अद्याप अधिकृतपणे विजयाची घोषणा करण्यात आली नसली तरी, नवाझ शरीफ यांनी विजय झाल्याचे जाहीर केले आहे.

६३ वर्षीय नवाझ शरीफ तिस-यांदा पाकिस्तानची सूत्रे संभाळणार असून, यापूर्वी दोनवेळा त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधानपद भूषविले आहे. विजयानंतर लाहोर येथे आपल्या समर्थकांना संबोधित करताना, नवाझ शरीफ यांनी पून्हा सत्ता मिळाल्याबद्दल अल्लाचे आभार मानले व देशाच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व पक्षांसोबत एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली. बेरोजगारी, महागाई आणि भारनियमन पाकिस्तान समोरील मुख्य आव्हाने असून, या समस्या सोडविण्याला आपले पहिले प्राधान्य असेल. आपण सर्वांना मिळून एकत्र काम करुया असे त्यांनी सांगितले.

सार्वत्रिक निवडणूकीत पक्षाला घवघवीत यश मिळाल्याने पीएमएल-एनच्या कार्यकर्त्यांचा संपूर्ण पाकिस्तानात जल्लोष सुरु आहे. शनिवारी मतदानाच्या दिवशी पाकिस्तानात सात बॉम्बस्फोट झाले. यात २९ जणांचा मृत्यू झाला तरीही, पाकिस्तानी जनतेने या दहशतवादाला शरण न जाता मोठया संख्येने मतदान केले. यात महिला मतदारांचा उत्साह विशेष लक्षवेधी होता.

संपूर्ण निवडणूक काळात तेहरीक-ए-तालिबान पक्षाने केलेल्या विविध दहशतवादी हल्ल्यात १५० हून कार्यकर्ते आणि उमेदवारांचा मृत्यू झाला. तालिबानने प्रामुख्याने धर्मनिरपेक्ष पक्षांना लक्ष्य केले. पाकिस्तानात झालेल्या भरघोस मतदानामुळे तेथील जनतेला लोकशाही हवी असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानात प्रथमच लोकनियुक्त सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर सत्तांतर होत आहे. यापूर्वीची अनेक सरकारे तेथील लष्कराने विशेषाधिकार वापरुन बर्खास्त केली आहेत.
 
 
  संबंधित बातम्या
मुख्यमंत्र्यांची अण्णांवर टीका
तंत्रज्ञानामुळे पोलिस भरतीत पारदर्शकता
परभणीत अट्टल गुन्हेगार अटकेत
इंदापुरात ऊस दरवाढीसाठी आंदोलन
माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना जामीन मंजूर
दिवाळी अंक स्पर्धा २०११
टीम अण्णांवर तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप
’ गधे को भी बाप बनाना पडता है’
महिलांसाठी ’ १०९१’ हेल्पलाईन सुरु होणार
११४ नगराध्यक्षपदे महिलांसाठी राखीव
त्या ’ कुत्र्यांना’ वेळीच आवरा - राज
नगरपरिषदा निवडणुकींसाठी ८ डिसेंबर रोजी मतदान
भोरच्या सर्वांगीण विकासासाठी निधी देवू
शेतीवरील बोजा कमी करण्यासाठी उद्योगाला चालना
उद्योजकांना प्रस्ताव पाठविण्याचे मेस्कोचे आवाहन
कोर समितीची होणार पुनर्रचना
विपश्यना वर्ग सुरु करण्याचे आदेश
दक्षता जनजागृती सप्ताह
स्व. इंदिरा गांधी पुण्यतिथी राष्ट्रीय संकल्प दिवस
कोर समिती बरखास्‍त होणार नाही
Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 - 40 Next
Records 201 to 220 of 1821
 
     
A Leading E-Newspaper from Osmanabad....
सर्व हक्क सुरक्षित. कॉपीराईट 2010. Powerd by :