
लातूर - विभागीय माहिती कार्यालय लातुरचे उपसंचालक म्हणून राधाकृष्ण मुळी यांनी आज पदभार स्विकारला. श्री. मुळी यांची उस्मानाबाद येथील जिल्हा माहिती अधिकारी पदावरुन उपसंचालक (माहिती) पदावर पदोन्नती झाली आहे.
श्री. मुळी यांचे विभागीय माहिती कार्यालय, तसेच जिल्हा माहिती कार्यालय लातुर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वागत केले. प्रारंभी विभागीय माहिती कार्यालयातील सहायक संचालक निशिकांत तोडकर यांनी श्री. मुळी यांचे तसेच जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, माहिती अधिकारी रामचंद्र देठे, माहिती सहायक र. रा. ताटीकोंडलवार, वाहनचालकांच्यावतीने बा. ब. बिडवे यांनीही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
श्री. राधाकृष्ण मुळी यांनी यापुर्वी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून बीड, लातूर, सोलापूर, जालना, यवतमाळ, उस्मानाबाद येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले आहे. यापुर्वीही श्री. मुळी यांच्याकडेच फेब्रुवारी, २०१२ पासून लातूर येथील माहिती उपसंचालक या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता.
यावेळी लघुलेखक आर. व्ही. मुगळे, लेखापाल अ. बा. देशपांडे, वरिष्ठ लिपीक शकील हाशमी, आ. ना. सोनवणे, चंद्रकांत कारभारी, विवेक डावरे, वाहनचालक न. बी. पुरी, मोहन कोळी, प्रवीण बिदरकर आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
|