A Leading E-Newspaper from Osmanabad....
     
 
 
ताज्या बातम्या
 
 
कॉंग्रेस विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा
(Updated on 01/06/2012 14 : 8 IST)
 
बंगळूर - कॉंग्रेसचे कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामैय्या यांनी आज (शुक्रवार) पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. पक्षनेतृत्त्वाला माझ्या नेतृत्त्वाविषयी आत्मविश्‍वास वाटत नसल्याने आपण हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

पक्ष नेतृत्त्वाला माझ्या नेतेपदाविषयी शंका आहे. त्यांना माझ्याविषयी आत्मविश्‍वास वाटत नाही. त्यामुळेच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मी सुचविलेल्या नावाकडे दुर्लक्ष केले जात आहे. ही बाब लक्षात घेऊनच मी पदाचा राजीनामा सादर केला आहे, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

सिद्धरामैय्या यांनी आपले समर्थक आणि माजी केंद्रीयमंत्री सी. एम. इब्राहिम यांचे नाव पक्षाला सूचविले होते. मात्र, पक्ष विरष्ठांनी हे नाव फेटाळून लावले. त्यामुळे ते नाराज झाले आहेत.

मी माझा राजीनामा कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रदेशाध्यक्ष जी. परमेश्‍वर यांच्याकडे पाठविला आहे. तसेच, विधानसभेचे सभापती के. जी. बोपैय्या यांच्याकडे गुरुवारी राजीनामा सादर केला आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले.

पक्षाच्या विरिष्ठांनी सुरवातीला इब्राहिम यांच्या नावाला मंजुरी दिली होती. मात्र, त्यानंतर मला कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांचे नाव काढून टाकण्यात आले, अशी नाराजी सिद्धरामैय्या यांनी व्यक्त केली.
 
 
  संबंधित बातम्या
पाकिस्तानात ‘नवाझ’ राज
नळेगाव एसटी स्फोट दारु गोळ्यामुळे
चित्रपट निर्मिती कार्यशाळेचे आयोजन
कुमार कदम यांना ’ शिवनेर’ कार पुरस्कार जाहीर
वडार समाजाच्या मागण्यांबाबत विचार करू - मुख्यमंत्री
वाढदिवस साजरा न करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय
कवी संमेलनासाठी न.प.अंदाज पत्रकात तरतूद
दुष्काळावर मात करण्यासाठी महत्वाचे निर्णय
मिश्र विवाह मेळावे, वर्ध्यात बैठक
विरोधकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी - मुख्यमंत्री
महालक्ष्मीच्या दागिन्याची मोजदाद
पेट्रोलमध्ये पुन्हा पावणेदोन रुपयांची वाढ
विकासाचा अजेंडा पुढे नेणारा अर्थसंकल्प
बाभळी बंधाराप्रकरणी राज्यातील जनतेचा विजय
अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्यांचं जीवन सुसह्य होईल
भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी रमेश पोकळे
महिलांची बँक सुरु होणार
रेल्वे अर्थसंकल्पात सुधारणा सूचवण्याची गरज
चेन्नई कसोटीत भारताचा दणदणीत विजय
प्रेम आणि शांतता भारतीय संस्कृतीची बलस्थाने
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 - 40 Next
Records 1 to 20 of 1821
 
     
A Leading E-Newspaper from Osmanabad....
सर्व हक्क सुरक्षित. कॉपीराईट 2010. Powerd by :