A Leading E-Newspaper from Osmanabad....
     
 
 
ताज्या बातम्या
 
 
ट्रकची व-हाडी बसला धडक, २७ मृत्यूमुखी
(Updated on 28/05/2012 9 : 37 IST)
 
ट्रकची व-हाडी बसला धडक, २७ मृत्यूमुखी पुणे- मुंबईहून पुण्याकडे लग्नाचे व-हाड घेऊन जाणा-या दोन खासगी बसला रविवारी (ता.२७) मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई-पुणे- द्रुतगती महामार्गावर खालापूरजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात २७ प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत. तर ११ जण जखमी झाले आहेत. मृतात तीन लहान बालकांचा व ११ महिलांचा समावेश आहे. जखमींवर पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. विशेष म्हणजे याच गाडीत असणारे नवरा आणि नवरी हे दोघेही सुखरुप आहेत.

द्रुतगती मार्गावरील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील येरवडा येथे राहाणारे बवले यांच्या कुटुंबाचे हे व-हाड होते. दोन खासगी बसमधून घाटकोपर येथे लग्न उरकून सर्वजण पुण्याकडे येण्यास येत होते. रात्री एकच्या दरम्यान यातील एक बस पंक्चर झाली म्हणून दोन्ही चालकांनी आपापल्या बस खालापूर टोलप्लाझा पासून काही अंतरावर महामार्गाच्या लगत उभ्या केल्या होत्या. त्यावेळी वेळ जावा म्हणून बसमधील व-हाडी मंडळी पाय मोकळे करण्यासाठी बसमधून खाली उतरले. त्याचवेळी मुंबईकडून येणा-या भरधाव ट्रकने या व-हाडींना चिरडले. त्यात जागीच १८ जण ठार झाले. तर काहींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अपघाताचे वृत्त कळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. मृतांपैकी सर्वजण येरवडा भागातील शास्त्रीनगर, लक्ष्मी नगर, नागपुर चाळ येथील रहिवासी आहेत. या घटनेमुळे या परिसरात शोककळा पसरली आहे. जखमींना पनवेलच्या रुग्णालयात दाखल केले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
  संबंधित बातम्या
पाकिस्तानात ‘नवाझ’ राज
नळेगाव एसटी स्फोट दारु गोळ्यामुळे
चित्रपट निर्मिती कार्यशाळेचे आयोजन
कुमार कदम यांना ’ शिवनेर’ कार पुरस्कार जाहीर
वडार समाजाच्या मागण्यांबाबत विचार करू - मुख्यमंत्री
वाढदिवस साजरा न करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय
कवी संमेलनासाठी न.प.अंदाज पत्रकात तरतूद
दुष्काळावर मात करण्यासाठी महत्वाचे निर्णय
मिश्र विवाह मेळावे, वर्ध्यात बैठक
विरोधकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी - मुख्यमंत्री
महालक्ष्मीच्या दागिन्याची मोजदाद
पेट्रोलमध्ये पुन्हा पावणेदोन रुपयांची वाढ
विकासाचा अजेंडा पुढे नेणारा अर्थसंकल्प
बाभळी बंधाराप्रकरणी राज्यातील जनतेचा विजय
अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्यांचं जीवन सुसह्य होईल
भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी रमेश पोकळे
महिलांची बँक सुरु होणार
रेल्वे अर्थसंकल्पात सुधारणा सूचवण्याची गरज
चेन्नई कसोटीत भारताचा दणदणीत विजय
प्रेम आणि शांतता भारतीय संस्कृतीची बलस्थाने
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 - 40 Next
Records 1 to 20 of 1821
 
     
A Leading E-Newspaper from Osmanabad....
सर्व हक्क सुरक्षित. कॉपीराईट 2010. Powerd by :