A Leading E-Newspaper from Osmanabad....
     
 
 
ताज्या बातम्या
 
 
‘राष्ट्रवादी’ चे प्रताप देशमुख परभणीचे पहिले महापौर
(Updated on 16/05/2012 20 : 44 IST)
 
परभणी - येथील पहिल्या महापौरपदी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रताप देशमुख यांची; तर उपमहापौरपदी याच पक्षाच्या साहेबजान लाला उर्फ सज्जू लाला यांची आज (ता.१६) निवड झाली. दोन्ही पदांच्या निवडीसाठी महापालिकेची सकाळी अकराला विशेष सभा झाली. शिवसेना सदस्य तटस्थ राहिले; तर भारतीय जनता पक्षाच्या दोन सदस्यांनी अपेक्षेनुसार ‘राष्ट्रवादी’ ला पाठिंबा दिला.

महापौरपदासाठी ‘राष्ट्रवादी’ चे प्रताप देशमुख यांना ३३, कॉंग्रेसचे उमेदवार भगवानराव वाघमारे यांना २४, उपमहापौरपदासाठी सज्जू लाला यांना ३३ तर कॉंग्रेसचे शिवाजी भरोसे यांना २४ मते मिळाली.

परभणी महापालिकेच्या पहिल्या महापौरपदी ‘राष्ट्रवादी’ चे श्री.देशमुख हेच विराजमान होतील, असे संकेत यापुर्वीच मिळाले होते. महापालिकेच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ३० सदस्य निवडून आले होते. कॉंग्रेस २३, शिवसेना आठ, भारतीय जनता पक्ष दोन, अपक्ष दोन असे पक्षीय बलाबल होते. ‘राष्ट्रवादी’ चे सर्वाधिक संख्याबळ असल्याने त्यांचाच महापौर व उपमहापौर होणार हे निश्‍चितच होते. त्यातच शिवसेनेच्या आठ सदस्यांना वरिष्ठ नेतेमंडळींनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवू नये, तटस्थ रहावे, असा ‘व्हीप’ जारी केला होता. त्यानुसार बुधवारी (ता.१६) सभागृहात ते कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष होते. शिवसेनेचे सदस्य कॉंग्रेसला पाठिंबा देतील, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत होती. मात्र, तसे घडले नाही. उलट भारतीय जनता पक्षाचे दोन सदस्य दिलीपसिंह ठाकूर व सौ. तिरूमला मोकिंद खिल्लारे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला मतदान करीत पक्षाने बजावलेला ‘व्हिप’ धुडकावल्याचे स्पष्ट झाले आहे. अपक्ष गुलमीर खान यांनी ‘राष्ट्रवादी’ च्या दोघांनाही मतदान केल्याचे स्पष्ट होत आहे. कॉंग्रेसच्या उमेदवारांना २३ व अपक्ष सदस्य शेख हसन यांचे मतदान झाल्याचे मानण्यात येत आहे.
 
 
  संबंधित बातम्या
राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी
उच्च शिक्षणाचा गुणात्मक विकास आवश्यक
पाकिस्तानात ‘नवाझ’ राज
नळेगाव एसटी स्फोट दारु गोळ्यामुळे
चित्रपट निर्मिती कार्यशाळेचे आयोजन
कुमार कदम यांना ’ शिवनेर’ कार पुरस्कार जाहीर
वडार समाजाच्या मागण्यांबाबत विचार करू - मुख्यमंत्री
वाढदिवस साजरा न करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय
कवी संमेलनासाठी न.प.अंदाज पत्रकात तरतूद
दुष्काळावर मात करण्यासाठी महत्वाचे निर्णय
मिश्र विवाह मेळावे, वर्ध्यात बैठक
विरोधकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी - मुख्यमंत्री
महालक्ष्मीच्या दागिन्याची मोजदाद
पेट्रोलमध्ये पुन्हा पावणेदोन रुपयांची वाढ
विकासाचा अजेंडा पुढे नेणारा अर्थसंकल्प
बाभळी बंधाराप्रकरणी राज्यातील जनतेचा विजय
अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्यांचं जीवन सुसह्य होईल
भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी रमेश पोकळे
महिलांची बँक सुरु होणार
रेल्वे अर्थसंकल्पात सुधारणा सूचवण्याची गरज
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 - 40 Next
Records 1 to 20 of 1823
 
     
A Leading E-Newspaper from Osmanabad....
सर्व हक्क सुरक्षित. कॉपीराईट 2010. Powerd by :