A Leading E-Newspaper from Osmanabad....
     
 
 
ताज्या बातम्या
 
 
१०० रुपयांत चॅनल्स!
(Updated on 02/05/2012 9 : 10 IST)
 
नवी दिल्ली - भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने डिजिटल केबल नेटवर्कसंदर्भात नव्या नियमांची घोषणा केली असून, आता या नियमानुसार १०० रुपयात किमान १०० मोफत चॅनल प्रसारित करावी लागणार आहेत. हा नियम ३० जून २०१२ पासून देशभर लागू होणार आहे.
ट्रायच्या आदेशानुसार, बेसिक सर्व्हिस टायर (बीएसटी)ची सुविधा ग्राहकांना देणे केबलचालकांना बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, ही ग्राहकांसाठी बंधनकारक नाही.
या अंतर्गत किमान १०० चॅनेल मोफत दाखवावे लागतील. यात १८ चॅनल दाखवणे अनिवार्य करण्यात आले आहे. अनिवार्य चॅनेलमध्ये दूरदर्शनची सर्व चॅनेल्स, तसेच लोकसभा, राज्यसभा चॅनेल यांचा समावेश आहे. ग्राहकांना जर बीएसटीशिवाय काही पे-चॅनेल पाहायचे आहेत तर त्यासाठी १५० रुपये मासिक शुल्क द्यावे लागेल.

नव्या नियमानुसार..
टीव्ही वाहिन्यांचा ५ घटकांत ढोबळ विभागणी करण्यात आली आहे.
यात जनरल एंटरटेनमेंट चॅनल (जीईसी), इंग्लिश, जीईसी हिंदी, प्रादेशिक, संगीत, बातम्या, चित्रपट, क्रीडा, मुले (किड्स), माहिती व मनोरंजन (इन्फोटेनमेंट), जीवनशैली (लाइफस्टाइल) आदींचा समावेश आहे.
दिल्ली, मुंबई, कोलकाता व चेन्नई या महानगरात केबल टीवी डिजिटलायजेशनची मुदत ३० जून २०१२ ही निश्‍चित केली आहे.
देशात केबल टीव्ही डिजिटलायजेशन पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०१४ पर्यंत मुदत आहे.
 
 
  संबंधित बातम्या
पाकिस्तानात ‘नवाझ’ राज
नळेगाव एसटी स्फोट दारु गोळ्यामुळे
चित्रपट निर्मिती कार्यशाळेचे आयोजन
कुमार कदम यांना ’ शिवनेर’ कार पुरस्कार जाहीर
वडार समाजाच्या मागण्यांबाबत विचार करू - मुख्यमंत्री
वाढदिवस साजरा न करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय
कवी संमेलनासाठी न.प.अंदाज पत्रकात तरतूद
दुष्काळावर मात करण्यासाठी महत्वाचे निर्णय
मिश्र विवाह मेळावे, वर्ध्यात बैठक
विरोधकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी - मुख्यमंत्री
महालक्ष्मीच्या दागिन्याची मोजदाद
पेट्रोलमध्ये पुन्हा पावणेदोन रुपयांची वाढ
विकासाचा अजेंडा पुढे नेणारा अर्थसंकल्प
बाभळी बंधाराप्रकरणी राज्यातील जनतेचा विजय
अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्यांचं जीवन सुसह्य होईल
भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी रमेश पोकळे
महिलांची बँक सुरु होणार
रेल्वे अर्थसंकल्पात सुधारणा सूचवण्याची गरज
चेन्नई कसोटीत भारताचा दणदणीत विजय
प्रेम आणि शांतता भारतीय संस्कृतीची बलस्थाने
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 - 40 Next
Records 1 to 20 of 1821
 
     
A Leading E-Newspaper from Osmanabad....
सर्व हक्क सुरक्षित. कॉपीराईट 2010. Powerd by :