A Leading E-Newspaper from Osmanabad....
     
 
 
ताज्या बातम्या
 
 
सिंघवी यांचा अखेर राजीनामा
(Updated on 24/04/2012 9 : 55 IST)
 
नवी दिल्ली- दोन दिवसापूर्वी युट्यूब व फेसबुकवर अज्ञातांनी टाकलेल्या सेक्स व्हिडिओमुळे अडचणीत आलेले काँग्रेसचे खासदार व प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी संसदेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. याचबरोबरच त्यांनी पक्षाचे प्रवक्तेपद सोडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाकडून याबाबत अधिकृत माहिती आलेली नाही. सेक्स सीडी कांडानंतर सिंघवी व काँग्रेसवर विरोधी पक्षांनी दबाव वाढविला होता. त्यामुळेच विरोधकांना याप्रकरणी फारशी संधी मिळू नये म्हणून सिंघवी यांनीच राजीनामा दिला आहे. सिंघवी यांची सीडी प्रसारित झाल्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ माजली होती.

अभिषेक मनु सिंघवी यांची कथित अश्लील सीडी अज्ञातांनी युट्यूब आणि सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकच्या माध्यमातून पोस्ट केली होती. ज्या फेसबुक अकाऊंटवरुन हा व्हिडिओ अपलोड केला गेला आहे ते अकाऊंट १९ एप्रिल रोजी बनविले गेले होते. त्यानंतर त्या व्हिडिओचे गूगल अकाऊंटवरुन पेज बनवून फेसबुकद्वारे हा व्हिडिओ टाकण्यात आला होता.तसेच हा व्हिडिओ ब्लॉक झाल्यास या आपल्या आयडीवर व्हिडिओची मागणी करावी, असे अज्ञातांनी म्हटले होते. १२ मिनिट ४० सेकंदाची ही सीडी म्हणजे अश्लील सीडीचा पहिला भाग टाकण्यात आला होता.

सिंघवी यांना काँग्रेस पक्षातून सात दिवसांच्या आता काढून टाका, नाहीतर त्यांच्याशी संबंधित असलेल्या उर्वरित सेक्स सीडी आणि व्हिडिओ अपलोड करेन, अशी धमकी दिली होती. व्हिडिओ पोस्ट करणा-या व्यक्तींने आणखी एक गंभीर इशारा देताना म्हटले होते की, जर आता हा व्हिडिओ हटविला गेला, तर केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा रशियातील वेश्येबरोबरचा व्हिडिओ पोस्ट करेन. सिंघवी यांनी कथित सेक्स सीडीबाबत जाहीर वक्तव्य केल्यानंतर अज्ञातांनी पुन्हा एकदा तोच सेक्स व्हिडिओ फेसबुकवर टाकला होता. त्यावेळी हा व्हिडिओ लाखो इंटरनेटधारकांनी पाहिला होता.
 
 
  संबंधित बातम्या
पाकिस्तानात ‘नवाझ’ राज
नळेगाव एसटी स्फोट दारु गोळ्यामुळे
चित्रपट निर्मिती कार्यशाळेचे आयोजन
कुमार कदम यांना ’ शिवनेर’ कार पुरस्कार जाहीर
वडार समाजाच्या मागण्यांबाबत विचार करू - मुख्यमंत्री
वाढदिवस साजरा न करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय
कवी संमेलनासाठी न.प.अंदाज पत्रकात तरतूद
दुष्काळावर मात करण्यासाठी महत्वाचे निर्णय
मिश्र विवाह मेळावे, वर्ध्यात बैठक
विरोधकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी - मुख्यमंत्री
महालक्ष्मीच्या दागिन्याची मोजदाद
पेट्रोलमध्ये पुन्हा पावणेदोन रुपयांची वाढ
विकासाचा अजेंडा पुढे नेणारा अर्थसंकल्प
बाभळी बंधाराप्रकरणी राज्यातील जनतेचा विजय
अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्यांचं जीवन सुसह्य होईल
भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी रमेश पोकळे
महिलांची बँक सुरु होणार
रेल्वे अर्थसंकल्पात सुधारणा सूचवण्याची गरज
चेन्नई कसोटीत भारताचा दणदणीत विजय
प्रेम आणि शांतता भारतीय संस्कृतीची बलस्थाने
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 - 40 Next
Records 1 to 20 of 1821
 
     
A Leading E-Newspaper from Osmanabad....
सर्व हक्क सुरक्षित. कॉपीराईट 2010. Powerd by :