A Leading E-Newspaper from Osmanabad....
     
 
 
ताज्या बातम्या
 
 
गणेशमूर्ती चोरी प्रकरणी ७ संशयित ताब्यात
(Updated on 21/04/2012 9 : 26 IST)
 
औरंगाबाद- रायगड जिल्ह्यातील दिवेआगार येथील प्रसिद्ध गणेश मंदिरातील सुवर्णमूर्तीच्या चोरीप्रकरणी औरंगाबादमधील गंगापूर तालुक्यातून सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दिवेआगार चोरीप्रकरणी जी रेखाचित्रे तयार केली गेली होती त्यात या सात संशयितांच्या चेह-यांशी जुळत असल्याने पोलिसांच्या विशेष शाखेने त्यांना ताब्यात घेतले आहे. गंगापूरमधील पाकोरा वस्तीत हे संशयित लपून बसले असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली.

हे आहेत संशयित सात जण- पाकोरा वस्तीत शुक्रवारी पहाटे विशेष शाखेने केलेल्या ताब्यात घेतलेल्या संशयिताकडून कु-हाड, चाकू, मिरच्याची पूड आदी साहित्य जप्त केले आहे. आकाश काळे (२०), बाळू काळे (१९), शेरु पिंपळे (२९), राजू पिंपळे (२५), जिगर ऊर्फ विजय पिंपळे (२२), गणेश पिंपळे (१९), मोहन काळे (२१) अशी संशयित ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

दिवेआगार येथून गेल्या महिन्यात सुवर्ण गणेशमूर्तीची चोरी करण्यात आली होती. तसेच दरोडेखोरांकडून तेथील दोन सुरक्षारक्षकांची हत्या करण्यात आली होती. यानंतर हे प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजले. चोरांचा शोध लागत नसल्याने सरकारवर निष्क्रीय असल्याचा ठपका ठेवत शिवसेनेने विधिमंडळात आरती केली होती. त्यामुळे शिवसेनेच्या १३ व भाजपच्या एका आमदाराचे निलंबन करण्यात आले होते. विशेष म्हणजे सरकारने या आमदारांचे शुक्रवारीच निलंबन मागे घेण्यात आले आहे.
 
 
  संबंधित बातम्या
पाकिस्तानात ‘नवाझ’ राज
नळेगाव एसटी स्फोट दारु गोळ्यामुळे
चित्रपट निर्मिती कार्यशाळेचे आयोजन
कुमार कदम यांना ’ शिवनेर’ कार पुरस्कार जाहीर
वडार समाजाच्या मागण्यांबाबत विचार करू - मुख्यमंत्री
वाढदिवस साजरा न करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय
कवी संमेलनासाठी न.प.अंदाज पत्रकात तरतूद
दुष्काळावर मात करण्यासाठी महत्वाचे निर्णय
मिश्र विवाह मेळावे, वर्ध्यात बैठक
विरोधकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी - मुख्यमंत्री
महालक्ष्मीच्या दागिन्याची मोजदाद
पेट्रोलमध्ये पुन्हा पावणेदोन रुपयांची वाढ
विकासाचा अजेंडा पुढे नेणारा अर्थसंकल्प
बाभळी बंधाराप्रकरणी राज्यातील जनतेचा विजय
अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्यांचं जीवन सुसह्य होईल
भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी रमेश पोकळे
महिलांची बँक सुरु होणार
रेल्वे अर्थसंकल्पात सुधारणा सूचवण्याची गरज
चेन्नई कसोटीत भारताचा दणदणीत विजय
प्रेम आणि शांतता भारतीय संस्कृतीची बलस्थाने
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 - 40 Next
Records 1 to 20 of 1821
 
     
A Leading E-Newspaper from Osmanabad....
सर्व हक्क सुरक्षित. कॉपीराईट 2010. Powerd by :