A Leading E-Newspaper from Osmanabad....
     
 
 
ताज्या बातम्या
 
 
भीषण अपघातात १५ ठार, ३५ जखमी
(Updated on 28/11/2011 13 : 11 IST)
 
भीषण अपघातात १५ ठार, ३५ जखमी बुलडाणा - नागपूर-औरंगाबाद महामार्गावर मेहकरनजीक चिंचोली बोरे फाट्याजवळ आज (सोमवार) पहाटे झालेल्या भीषण अपघातात १५ प्रवासी ठार झाले असून पाच जणांची प्रकृती चिंताजनक बनलेली आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. अपघातात ३५ जखमी असून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी, आज पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास नागपूर व पुण्याकडे जात असलेल्या खासगी प्रवासी लक्‍झरी बसेसची समोरासमोर धडक झाली. रस्त्यावर असलेला खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात चालकांचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यामुळे दोन्ही बसेस समोरासमोर आदळल्याने अचानक पेटल्या. काही क्षणात दोन्ही बसेसला आगीने वेढले. यामुळे आतील प्रवाशांच्या एकच किंकाळ्या निघाल्या. जो तो आपला जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करू लागला. पहाटेची वेळ असल्याने प्रवासी झोपलेले होते. त्यामुळे अनेकांना जीवसुद्धा वाचविता आला नाही. यामुळे १५ जण होरपळून ठार झाले. घटनेची माहिती कळताच मेहकर शहरातील नागरिक, चिंचोली बोरे गावातील काही जण धावले. दोन्ही गाड्या अवघ्या काही वेळात जळून खाक झाल्या. मृतक प्रवाशांविषयी सध्या काहीही माहिती समोर आलेली नाही. नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक आदी ठिकाणचे काही मृतक असल्याचा अंदाज असून पोलिस नातेवाइकांशी संपर्क साधत आहेत. जखमीवर मेहकर ग्रामीण रुग्णालय, खासगी हॉस्पिटल तसेच गंभीर जखमींना औरंगाबाद येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
 
 
  संबंधित बातम्या
राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी
उच्च शिक्षणाचा गुणात्मक विकास आवश्यक
पाकिस्तानात ‘नवाझ’ राज
नळेगाव एसटी स्फोट दारु गोळ्यामुळे
चित्रपट निर्मिती कार्यशाळेचे आयोजन
कुमार कदम यांना ’ शिवनेर’ कार पुरस्कार जाहीर
वडार समाजाच्या मागण्यांबाबत विचार करू - मुख्यमंत्री
वाढदिवस साजरा न करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय
कवी संमेलनासाठी न.प.अंदाज पत्रकात तरतूद
दुष्काळावर मात करण्यासाठी महत्वाचे निर्णय
मिश्र विवाह मेळावे, वर्ध्यात बैठक
विरोधकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी - मुख्यमंत्री
महालक्ष्मीच्या दागिन्याची मोजदाद
पेट्रोलमध्ये पुन्हा पावणेदोन रुपयांची वाढ
विकासाचा अजेंडा पुढे नेणारा अर्थसंकल्प
बाभळी बंधाराप्रकरणी राज्यातील जनतेचा विजय
अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्यांचं जीवन सुसह्य होईल
भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी रमेश पोकळे
महिलांची बँक सुरु होणार
रेल्वे अर्थसंकल्पात सुधारणा सूचवण्याची गरज
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 - 40 Next
Records 1 to 20 of 1823
 
     
A Leading E-Newspaper from Osmanabad....
सर्व हक्क सुरक्षित. कॉपीराईट 2010. Powerd by :