
मुंबई ह्न जनलोकपाल विधेयकासाठी आंदोलन करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात शीतयुद्ध सुरु झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अण्णांवर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी अण्णां राजकारणात आले तर राजकारण ‘श्रीमंत’ होईल, असा टोला लगावला. तर अण्णांनी मुख्यमंत्र्यांवर ‘लवासा’ वरुन तोफ डागली.
मुंबई पत्रकारांसोबत बोलतांना मुख्यमंत्र्यांनी अण्णांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, टीम अण्णातील सदस्यांना राजकारणात प्रवेश करायचा आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आतातरी ते खुलेपणाने याबाबत बोलावे. तुम्हाला राजकारणात यायचे असेल, तर जरूर यावे. त्यामुळे राजकारण ‘श्रीमंत’ च होईल. टीम अण्णाच्या सदस्यांनी राजकारणात भाग घेतला, निवडणूक लढवली, तर त्यात गैर काहीच नाही. परंतु, त्यातून बाहेर राहून एखाद्या पक्षाला समर्थन देणे किंवा विरोध करणे चुकीचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. असे करण्यापेक्षा त्यांनी त्यांचा कोणत्या पक्षाला पाठींबा आहे, कोणत्या विचारधारेला समर्थन आहे, हे स्पष्टपणे सांगावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले.
अण्णांनी आगामी निववडणुकांमध्ये कॉंग्रेसच्या विरोधात प्रचार करण्याचे जाहिर केले आहे. परंतु, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अण्णांचा प्रभाव पडणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
|