A Leading E-Newspaper from Osmanabad....
     
 
 
ताज्या बातम्या
 
 
राजीव गांधींच्या मारेक-यांची फाशी लांबणीवर
(Updated on 30/08/2011 23 : 30 IST)
 
चेन्नई- भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेक-यांना फाशीला मद्रास उच्च न्यायालयाने आठ आठवडे स्थगिती दिली आहे. राजीव यांच्या मारेक-यांच्या दयेच्या अर्जांचा राष्ट्रपतींनी फेरविचार करावा, अशी मागणी करणारा ठराव तामिळनाडू विधानसभेनेही मंगळवारी एकमताने मंजूर केला.

राजीव गांधी यांच्या मारेक-यांना येत्या नऊ सप्टेंबर रोजी फाशीची शिक्षा होणार होती. मात्र ही फाशीची शिक्षा माफ करावी अशी मागणी करणारी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्या. सी नागप्पन आणि न्या. एम सत्यनारायणन यांनी फाशीला स्थगिती देत यासंदर्भात केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पोलिसांना नोटिसा बजावल्या आहेत.

सध्या वेल्लोरच्या मध्यवर्ती कारागृहात असलेले मुरुगन, संथन आणि पेरारीवलन या तिघांच्या फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने १९९९ मध्ये शिक्कामोर्तब केले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपतींकडे केलेले दयेचे अर्ज ११ वर्षे पडून का होते, अशी विचारणा न्यायालयाने केली आहे. हीच भूमिका याचिकाकर्त्यांचे वकील राम जेठमलानी, कोलिन गोन्साल्विस आणि आर वाईगई या वकिलांनी युक्तीवादात मांडली होती.

दयेच्या अर्जाचा फेरविचार करावा, अशी मागणी या तिघांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्याकडे केली होती. दयेचा अधिकार आपल्याला नाही, असे सांगत जयललिता यांनी या प्रकरणातून हात झटकले होते. मात्र डीएमके आणि अन्य काही राजकीय पक्षांनी या तिघांना माफी देण्याचा मुद्दा लावून धरल्याने तामिळनाडू विधानसभेने मंगळवारी या तिघांच्या दयेच्या अर्जांचा फेरविचार करण्याची मागणी करणारा ठराव एकमताने संमत केला.

या मारेक-यांपैकी मुरुगनची मुलगी हरिता हिने वडिलांची शिक्षा माफ करावी अशी विनंती केली होती. सध्या लंडनमध्ये शिकणारी हरिता १५ दिवसांसाठी भारतात येण्याची शक्यता आहे.

विधानसभेने संमत केलेल्या ठरावाचा विचार करणे कायद्याने बंधनकारक नाही, असे कायदामंत्री सलमान खुर्शीद यांनी नवी दिल्लीत स्पष्ट केले.
 
 
  संबंधित बातम्या
पाकिस्तानात ‘नवाझ’ राज
नळेगाव एसटी स्फोट दारु गोळ्यामुळे
चित्रपट निर्मिती कार्यशाळेचे आयोजन
कुमार कदम यांना ’ शिवनेर’ कार पुरस्कार जाहीर
वडार समाजाच्या मागण्यांबाबत विचार करू - मुख्यमंत्री
वाढदिवस साजरा न करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय
कवी संमेलनासाठी न.प.अंदाज पत्रकात तरतूद
दुष्काळावर मात करण्यासाठी महत्वाचे निर्णय
मिश्र विवाह मेळावे, वर्ध्यात बैठक
विरोधकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी - मुख्यमंत्री
महालक्ष्मीच्या दागिन्याची मोजदाद
पेट्रोलमध्ये पुन्हा पावणेदोन रुपयांची वाढ
विकासाचा अजेंडा पुढे नेणारा अर्थसंकल्प
बाभळी बंधाराप्रकरणी राज्यातील जनतेचा विजय
अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्यांचं जीवन सुसह्य होईल
भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी रमेश पोकळे
महिलांची बँक सुरु होणार
रेल्वे अर्थसंकल्पात सुधारणा सूचवण्याची गरज
चेन्नई कसोटीत भारताचा दणदणीत विजय
प्रेम आणि शांतता भारतीय संस्कृतीची बलस्थाने
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 - 40 Next
Records 1 to 20 of 1821
 
     
A Leading E-Newspaper from Osmanabad....
सर्व हक्क सुरक्षित. कॉपीराईट 2010. Powerd by :