A Leading E-Newspaper from Osmanabad....
     
 
 
ताज्या बातम्या
 
 
मोबाईल बॅटऱ्यांवर चालतो कुलर आणि पंखाही....
(Updated on 26/08/2011 20 : 26 IST)
 
उस्मानाबाद - टाकाऊ वस्तूंपासून गृहोपयोगी इलेक्‍ट्रिक, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू तयार करण्याचा ‘छोटासा कारखाना’ एका तरुणाने घरातच सुरू केला आहे. त्याच्या आजपर्यंतच्या प्रयोगांतून अनेक नावीन्यपूर्ण वस्तूंनी आकार घेतला आहे. मोबाईलच्या खराब झालेल्या बॅटऱ्यांवर कुलर आणि पंखा चालवण्याचे त्याचे तंत्र अविश्‍वसनीयच असेच आहे.

सुनील सुरेश माळी असे या तरुणाचे नाव. मस्सा (खंडेश्‍वरी, ता. कळंब) हे त्यांचे मूळ गाव. उस्मानाबादेतील पोलिसलाईन येथील लिटल स्टार प्राथमिक शाळेजवळ त्यांचे पत्र्याचे शेडवजा घर आहे. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी २००८ मध्ये सोलापूर येथे कोहिनूर टेक्‍निकल इन्स्टिट्यूटमध्ये तीन महिने कालावधीचा मोबाईल रिपेअरिंग अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. विविध प्रयोग करण्याची सवय असल्याने व अंगातील मेकॅनिक स्वस्थ बसू देत नसल्याने त्यांनी टाकाऊ वस्तूंपासून अनेक टिकाऊ वस्तू बनविल्या आहेत. विशेषतः मोबाईलच्या बंद पडलेल्या व खराब झालेल्या बॅटरीवर चालणारी अनेक उपकरणे तयार केली आहेत.

१२ व्होल्ट (डीसी) बॅटरीवर चालणाऱ्या कुलरची त्यांनी निर्मिती केली आहे. हे कुलर १० ते १२ तास सलग चालते. पाच ते सहा लिटर पाणी लागते. १० बाय १० ची खोली २० ते २५ मिनिटात थंड होऊ शकते. मोबाईलच्या बंद पडलेल्या बॅटरीवर चालणारा पंखाही त्यांनी तयार केला आहे. तीन ते चार तास हा पंखा चालतो. एका माणसाला व्यवस्थित हवा मिळू शकते. संगणकाच्या ‘युएसबी’ पोर्टवर सुद्धा फॅन चालू शकतो. या पंख्यामध्ये मोबाईल चार्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

शहरासह ग्रामीण भागात अनेकांच्या घरासमोर पाण्याचे नळ असतात. गृहिणी घरामध्ये काम करीत असताना नळाला पाणी आल्यानंतर माहिती होत नाही. नळाला पाणी आल्यानंतर सूचित करणारे यंत्रही त्यांनी विकसित केले आहे. मोबाईलच्या खराब बॅटरीवर चालणारी बॅटरी (टॉर्च) तयार केली आहे. ही बॅटरी सलग चार तास चालते. १० बाय १० च्या खोलीमध्ये प्रकाश मिळू शकतो. १० सेंटीमीटर उंचीचा छोटा पंखाही तयार करण्यात आला आहे. हा पंखा सलग १० ते १२ तास चालतो. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी आवश्‍यक असणारा टेबल लँप तयार केला आहे. हा लँपही मोबाईलच्या खराब बॅटरीवर चालतो. १० ते १२ तास सलग चालतो.

भांडी घासण्याची मशिनही तयार करण्यात आली आहे. या मशिनवर चाकू, विळी आदी वस्तूंना धार लावता येते. चार्जिंग बॅटरीवर घराची घंटी (बेल) तयार केली आहे. मोबाईल रिपेअरिंग करणाऱ्या मेकॅनिकला उपयोगी पडणारी ‘पेन्सिल गण’ ची निर्मिती केली आहे. वीज गेल्यानंतरही ही मशिन चालू शकते. मशिनला चार्जिंग करण्याची सोय करण्यात आली आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या ‘पेन्सिल गण’ ची दुरुस्ती होत नाही. परंतु श्री. माळी यांनी तयार केलेल्या गणची दुरुस्ती करता येते. १२ व्होल्टवर चालणारी पाणी उपसणारी इलेक्‍ट्रिक मोटारही त्यांनी तयार केली आहे.

’ देवघरा’ चा ताजा प्रयोग
आता सर्वात ताजा प्रयोग म्हणजे अनेक टाकाऊ वस्तूंपासून आकार दिलेले देवघर. महालक्ष्मी सणाच्या निमित्ताने श्री. माळी यांनी टाकाऊ वस्तूंपासून देवघर तयार केले आहे. लाइट फिटिंग करण्यासाठी लागणाऱ्या केसिंग पट्ट्या (खराब झालेल्या), ट्यूबची खराब पट्टी, कुलरच्या समोरील खराब लाकडी पट्टी, लाकडाचा लाइट बोर्ड आदी वस्तूंचा वापर करून देवघराची निर्मिती केली आहे. देवघराला चार चाके जोडण्यात आली आहेत. दानपेटी, म्युझिक सिस्टिमची सोय करण्यात आली आहे.

महिन्याला किमान एक प्रयोग
सुनील माळी या मेकॅनिकचे तंत्रकौशल्य अनोखे आहे. एका महिन्यात किमान एक तरी नवा प्रयोग ते करतात. तेही टाकाऊ वस्तूंपासून तयार करीत असल्याने वाया जाणाऱ्या घटकांनाही त्यांनी मूल्य प्राप्त करून दिले आहे. सहा बाय सात इंच आकाराचा कुलर त्यांनी तयार केला आहे. ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद व्हावी, यासाठी हा कुलर पाठविण्यात आला आहे.
 
 
  संबंधित बातम्या
राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी
उच्च शिक्षणाचा गुणात्मक विकास आवश्यक
पाकिस्तानात ‘नवाझ’ राज
नळेगाव एसटी स्फोट दारु गोळ्यामुळे
चित्रपट निर्मिती कार्यशाळेचे आयोजन
कुमार कदम यांना ’ शिवनेर’ कार पुरस्कार जाहीर
वडार समाजाच्या मागण्यांबाबत विचार करू - मुख्यमंत्री
वाढदिवस साजरा न करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय
कवी संमेलनासाठी न.प.अंदाज पत्रकात तरतूद
दुष्काळावर मात करण्यासाठी महत्वाचे निर्णय
मिश्र विवाह मेळावे, वर्ध्यात बैठक
विरोधकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी - मुख्यमंत्री
महालक्ष्मीच्या दागिन्याची मोजदाद
पेट्रोलमध्ये पुन्हा पावणेदोन रुपयांची वाढ
विकासाचा अजेंडा पुढे नेणारा अर्थसंकल्प
बाभळी बंधाराप्रकरणी राज्यातील जनतेचा विजय
अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्यांचं जीवन सुसह्य होईल
भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी रमेश पोकळे
महिलांची बँक सुरु होणार
रेल्वे अर्थसंकल्पात सुधारणा सूचवण्याची गरज
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 - 40 Next
Records 1 to 20 of 1823
 
     
A Leading E-Newspaper from Osmanabad....
सर्व हक्क सुरक्षित. कॉपीराईट 2010. Powerd by :