A Leading E-Newspaper from Osmanabad....
     
 
 
ताज्या बातम्या
 
 
मला राखी बांधण्याकरिता बहिण पाहिजे
(Updated on 14/08/2011 20 : 57 IST)
 
मला राखी बांधण्याकरिता बहिण पाहिजे सातारा दि.१२( प्रतिनिधी)- मला राखी बांधण्याकरिता बहिण पाहिजे, अशी प्रतिज्ञा शहरातील व जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी घेतली. सातारा जिल्हा परिषदेचे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, इंडियन मेडिकल असो., आणि जिल्ह्यातील शाळा , महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हापरिषदेच्या मैदानावर रक्षाबंधनाच्या निमित्ताने स्त्री भ्रुण हत्या रोखण्यासाठी आयोजित केलेल्या प्रतिज्ञा सोहळ्यात आज हजारो विद्यार्थी - विद्यार्थिनी नी शपथ घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी * माझ्या ज्या बहिणीचे गर्भजल निदान अथवा सोनोग्राफीद्वारे निदान करून हत्याकांड होत आहे. त्यांचे संरक्षण करणे हे माझे आद्य कर्तव्य असून मला ज्ञात असलेल्या सर्व मार्गांनी मी त्याला कडाडून विरोध करेन. यासाठी समाजातील सर्व घटक मग ते कोणीही असोत. अगदी माझे आप्तेष्ट असले तरी मी या प्रतिज्ञा द्वारे त्यांना यापासून परावृत्त करण्यासाठी सर्व प्रयत्न घटनेच्या अधीन राहून करेन. माझ्या बहिणीचे संरक्षण करणे हे माझे कर्तव्यच असून जन्माला येणे, सन्मानाने जगणे हा तिचा हक्कच आहे. याची मी पुरेपूर जाणीव ठेवीन. आज रक्षाबंधनाच्या दिवशी या प्रतिज्ञा द्वारे मी तिच्या सुरक्षेचे हे बंधन आनंदाने आणि आदरपूर्वक स्वेच्छेने स्वीकारीत आहे.* अशी प्रतिज्ञा या वेळी घेतली. यावेळी जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा ज्योती जाधव, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, जि. प मुख्य कार्यकारी श्याम देशपांडे, पोलीस अधीक्षक के.एम. एम. प्रसन्ना, अतिरिक्त जिल्हाधिकारी बी.एस.पऱ्हाड, उपजिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर, जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवानराव पवार, शिक्षण अधिकारी मकरंद गोंधळी व जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते.
 
 
  संबंधित बातम्या
पाकिस्तानात ‘नवाझ’ राज
नळेगाव एसटी स्फोट दारु गोळ्यामुळे
चित्रपट निर्मिती कार्यशाळेचे आयोजन
कुमार कदम यांना ’ शिवनेर’ कार पुरस्कार जाहीर
वडार समाजाच्या मागण्यांबाबत विचार करू - मुख्यमंत्री
वाढदिवस साजरा न करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय
कवी संमेलनासाठी न.प.अंदाज पत्रकात तरतूद
दुष्काळावर मात करण्यासाठी महत्वाचे निर्णय
मिश्र विवाह मेळावे, वर्ध्यात बैठक
विरोधकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी - मुख्यमंत्री
महालक्ष्मीच्या दागिन्याची मोजदाद
पेट्रोलमध्ये पुन्हा पावणेदोन रुपयांची वाढ
विकासाचा अजेंडा पुढे नेणारा अर्थसंकल्प
बाभळी बंधाराप्रकरणी राज्यातील जनतेचा विजय
अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्यांचं जीवन सुसह्य होईल
भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी रमेश पोकळे
महिलांची बँक सुरु होणार
रेल्वे अर्थसंकल्पात सुधारणा सूचवण्याची गरज
चेन्नई कसोटीत भारताचा दणदणीत विजय
प्रेम आणि शांतता भारतीय संस्कृतीची बलस्थाने
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 - 40 Next
Records 1 to 20 of 1821
 
     
A Leading E-Newspaper from Osmanabad....
सर्व हक्क सुरक्षित. कॉपीराईट 2010. Powerd by :