
सातारा ( सम्राट गायकवाड ) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा नंदिनी कोंढालकर यांनी सातारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आ. दिवाकर रावते यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी त्यांचे पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देवून पक्षात स्वागत केले. नंदिनी कोंढालकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा व वात्सल्य फौंडेशन च्या अध्यक्षा म्हणून महिलांसाठी व अनाथ मुलांसाठी काम करत आल्या आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना मिळालेले ५०% आरक्षणाची महिलांमध्ये प्रभावीपणे जनजागृती करणार आहे. यासाठी लवकरच प्रत्येक तालुक्यात महिला मेळाव्याचे आयोजन करणार आहे. जिल्ह्यात महिला कामगार नाहीत त्यांना संघटीत करणार आहे. जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगार युवक , युवतींची संख्या वाढत चालली आहे. बेरोजगारी संपवण्यासाठी युवक, युवती साठी शिवसेनेच्या माध्यमातून नवीन उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नंदिनी कोंढालकर यांनी सांगितले. नंदिनी कोंढालकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल आ. नीलम गोरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख हणमंत चवरे , चंद्रकांत जाधव , श्रीमंत फडतरे किशोर पंडित , श्रीनिवास जाधव , एकनाथ संकपाळ , आतिष ननावरे यांनीअभिनंदन केले
|