
मुंबई- विरोधी पक्षांच्या आमदारांनी घातलेल्या प्रचंड गोंधळात, अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा २०११-१२ या आर्थिक वर्षासाठीचा तुटीचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाला सुरुवात होताच विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभागृहात सरकारविरुद्ध घोषणा देण्यास सुरुवात केली. या गोंधळातच पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला.
अर्थसंकल्पामधील घोषणांमुळे मुंबईकरांचा लाडका पदार्थ वडापाव आता स्वस्त होणार आहे. हॉटेलमधील पदार्थांवर लावलेला १२.५ व्हॅट (मूल्यवर्धित कर) वडापावासाठी पाच टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे वडापावाच्या दरात लक्षणीय घट होणार आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्थसंकल्पी भाषणात विरोधी पक्षांच्या आमदारांनी गोंधळ घातल्यामुळे, अर्थसंकल्पातील घोषणा सभागृहातील आमदारांना कळत नव्हत्या.
अर्थसंकल्पातील काही ठळक तरतुदी--
* जवाहर विहिर योजनेसाठी २२१ कोटी रुपये
* कंत्राटी पद्धतीचा जोडधंदा म्हणून कुक्कुटपालनाला चालना
* फलोत्पादनासाठी १३२ कोटी रुपये
* रुग्णालय सक्षमीकरणासाठी ५७ कोटी रुपये
* बालकामगार निर्मूलन योजनेसाठी १६ कोटी रुपये
* सिंचन प्रकल्पासाठी भरीव तरतूद
* प्राथमिक आरोग्य सुधारणांसाठी २४ कोटी रुपये
* महाराष्ट्र सुजल योजनेसाठी ३४ कोटी रुपये
* आयटीआय आणि तंत्रनिकेतनसाठी ४० कोटी रुपये
* पुण्यातल्या ससून रुग्णालयासाठी २० कोटी ५० लाख रुपये
* कुस्तीगीर मारुती मानेंचे स्मारक बांधणार
* हिंदकेसरी आणि महाराष्ट्र केसरी पुरस्कारांच्या रकमेत वाढ
* कुस्ती-कबड्डी स्पर्धांच्या अनुदानासाठी ५० कोटींची तरतूद
* महिलांसाठी जिल्हास्तरावर समुपदेशन केंद्र
* आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी विशेष सुविधा
* रस्ते विकासासाठी २७५० कोटींची तरतूद
* यंदाच्या वर्षात १५०० मेगावॅट अतिरिक्त वीज निर्माण करणार
* २०१२ सालापर्यंत महाराष्ट्र भारनियमनमुक्त करणार, त्यासाठी १५०० कोटींची तरतूद
* संजय गांधी निराधार योजनेसाठी ३८० कोटींची तरतूद
* वस्त्रोद्योग धोरणासाठी १०० कोटींची तरतूद
* मिहान प्रकल्पाला ७० कोटी रुपये
* किल्ले संवर्धनासाठी २० कोटी रुपयांची तरतूद
* गेटवे ऑफ इंडियावर जेट्टी उभारणार
* २५ मेगावॅट क्षमतेचे जलविद्युत प्रकल्प उभारणार
* नाट्य परिषदेसाठी पाच कोटी रुपये
* मुंबईच्या सुरक्षेसाठी शहरभर सीसीटीव्ही
* शिवनेरी, रायगड, प्रतापगडावर पर्यटकांसाठी सुविधा
* कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरासाठी १० कोटींची तरतूद
* औष्णिक वीजनिर्मिती करणा-या शहरांसाठी २५० कोटींचा आराखडा
* पोलिस दल आधुनिकीकरणासाठी विशेष निधी
* आयटी विकासासाठी ४० कोटींची तरतूद
* नागपूर, मुंबई विधानभवन नूतनीकरणासाठी २१ कोटींची तरतूद
* माहिती आणि जनसंपर्क विभागासाठी ४८ कोटींची तरतूद
* व्याघ्र प्रकल्पासाठी २५ कोटी
* यंत्रमाघधारकांसाठी ५०० कोटींची तरतूद
* चंद्रपूर शहर विकासासाठी २५० कोटी रुपयांची तरतूद
* मुंबई विधानभवन सुरक्षिततेसाठी पाच कोटी
* लहान बेकरी व्यावसायिक उलाढालीची मर्यादा ५० लाखापर्यंत
* खतांचा राखीव साठी ठेवण्यासाठी विशेष निधी
हे स्वस्त होणार...
*
तांदूळ, गहू, डाळी आणि त्यांचे पीठ तसेच मिरची, हळद, गुळ, चिंच, नारळ, धणे, मेथी, पापड, खजूर, सोलापुरी चादरी, टॉवेल या वस्तूंवरील करमाफीला एक वर्षांची मुदतवाढ.
*
हॉटेलमध्ये विकला जाणारा वडापाव.
*
चहावरील करातील पाच टक्क्यांची सवलत कायम.
*
चित्रपटांच्या कॉपीराईट हस्तांतरावरील करमाफ.
*
बायोगॅसला चालना मिळावी यासाठी संबंधित यंत्रणेवरील करही माफ करण्यात आला आहे.
हे महाग होणार...
*
शीतपेयांवरील (कार्बोहायड्रेडयुक्त) व्हॅटमध्ये वाढ.
*
फोर स्टार आणि त्यापुढील तारांकित हॉटेलांमधील दारुच्या किमतीत २० टक्के वाढ. तर बार आणि रेस्टॉरंटमधील मद्यावर पाच टक्के अतिरीक्त कर.
*
विविध दूरचित्रवाहिन्यांना विकल्या जाणा-या कार्यक्रमांच्या प्रसारण हक्कावरही पाच टक्के कर.