
मुंबई : मागील तीन वर्षांपासून बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणा-या नर्मदा (गोविंदाची मुलगी) लवली सिंगचा चित्रपट मनचलीद्वारा मोठ्या पडद्यावर येत आहे.
या चित्रपटात नर्मदेचा हिरो बॉक्सर विजेंदर सिंग आहे. हा चित्रपट पूर्णत: एका लव्ह स्टोरीवर आधारित आहे आणि यात कुठेही बॉक्सिंग दिसणार नाही. नर्मदाचे पदार्पण चांगल्याप्रकारे व्हावे, याकरिता गोविंदा ब-याच वर्षांपासून वाट बघत होता. तसे पाहिले तर तो स्वत: नर्मदेस लाँच करू शकत होता. परंतु त्याला एका चांगल्या कथेसोबतच संजय लीला भन्साळीसारख्या दिग्दर्शकाचा शोध होता.नर्मदेत बॉलिवूडच्या कुठल्याच मोठ्या बॅनरने रूची घेतली नाही. यात गोविंदाचा खास मित्र सलमान खानपण सामील आहे. त्यानेदेखील दबंगमध्ये नर्मदाऐवजी शत्रुघ्न सिन्हाच्या मुलीला संधी दिली. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार मनचली ही एका लहान शहराची कथा आहे आणि गोविंदादेखील याच्या स्क्रिप्टवर संतुष्ट आहे. विशेष म्हणजे गोविंदादेखील या चित्रपटात एका छोट्या भूमिकेत दिसेल.
|