A Leading E-Newspaper from Osmanabad....
     
 
 
ताज्या बातम्या
 
 
जिल्हा प्रशासनाचा संपर्क कक्ष कार्यान्वित
(Updated on 19/06/2013 16 : 55 IST)
 
उस्मानाबाद - जिल्ह्यातील जे भाविक उत्तराखंड येथे गेले आहेत, त्यांच्या कुटूंबियांनी अथवा नातेवाईकांनी त्यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे द्यावी. जिल्हा प्रशासनामार्फत त्यासाठी संपर्क कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून देहरादून येथील संपर्क कक्षाशीही जिल्हा प्रशासनामार्फत संपर्क साधून माहिती घेतली जात असल्याचे जिल्हाधिकारी ज्ञानोबा फुलारी यांनी कळविले आहे.

संपर्क कक्षाचे दूरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.- जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद- ०२४७२-२२४५०१, अपर जिल्हाधिकारी- २२७३०३, निवासी उपजिल्हाधिकारी-२२७३०, तहसीलदार, उस्मानाबाद-२२७८८३. याशिवाय, जिल्हाधिकारी श्री. फुलारी (मो.क्र. ९४२३०७६२४७), निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड (९४२२७१३७५६), तहसीलदार सुभाष काकडे (९४२३१७०५७७) यांच्याशी थेट संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनामार्फत उत्तराखंड प्रशासनाशी तसेच महाराष्ट्र शासनाने तेथे स्थापन केलेल्या मदत कक्षाशी संपर्क साधून माहिती घेतली जात आहे. ज्या नागरिकांचा त्यांच्या उत्तराखंड येथे गेलेल्या नातेवाईकांशी अथवा कुटुंबियांशी संपर्क झाला असेल, त्यांनीही त्याबाबतची माहिती द्यावी. तसेच ज्या प्रवासी कंपन्यामार्फत याठिकाणी पर्यटन सहलींचे आयोजन करण्यात आले होते, त्यांनीही प्रवासी भाविकांची-पर्यटकांची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी, जेणेकरुन समन्वय साधून संपर्क करणे आणि त्यांना मदत करणे सुलभ होऊ शकेल, असे जिल्हाधिकारी फुलारी यांनी कळविले आहे.
 
 
  संबंधित बातम्या
गटविकास अधिकारी आचारसंहिता प्रमुख
७ मार्चपर्यंत जागृती सप्ताहाचे आयोजन
जिल्हयात शस्त्रबंदी व जमावबंदी
ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्‌रम जाहीर
कनिष्ठ अभियंता व लिपीक टंकलेखक परीक्षेबाबत सूचना
३ मार्चला महा लोकअदालत
उजनी पाणीपुरवठा योजनेची प्रत्यक्ष पाहणी
ग्रंथोत्सवात ३ लाखांची पुस्तक विक्री
पुण्याहून अमरावतीला रविवारपासून रेल्वेगाडी
वाचनसंस्कृती जोपासण्याची नितांत गरज- प्रा.जोशी
भाजपची निदर्शने; शिवसेनेचे निवेदन
उजनीच्या पाण्याने बार्शी ओलांडली
द्राक्ष व आंब्याची निर्यात करणे आवश्यक -चाकूरकर
उस्मानाबादेत मनसे आणि राष्ट्रवादीत राडा
गप्पांतून उलगडला सावित्रीच्या लेकींचा जीवनप्रवास
समतानगरमधील तरूणीची जाळून घेवून आत्महत्त्या
पालकमंत्री चव्हाण जिल्हा दौरा
उस्मानाबाद पालिकेचा ८८.७७ कोटींचा अर्थसंकल्प
मारहाणप्रकरणी चौघांना सक्तमजुरी
उजनीच्या पाण्याचा उस्मानाबादच्या दिशेने प्रवास सुरू
Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 - 40 Next
Records 341 to 360 of 5777
 
     
A Leading E-Newspaper from Osmanabad....
सर्व हक्क सुरक्षित. कॉपीराईट 2010. Powerd by :