A Leading E-Newspaper from Osmanabad....
     
 
 
ताज्या बातम्या
 
 
जनावरांना पावसाळयापुर्वी लसीकरण करण्याचे आवाहन
(Updated on 21/05/2013 19 : 33 IST)
 
उस्मानाबाद -जिल्ह्यातील सर्व पशुपालक व शेतकऱ्यांना सूचित करण्यात येते , उन्हाळयात चारा, पाण्याअभावी जनावरांचे कूपोषण होते. त्यांची प्रकृतीही ढासळल्याने जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. जनावरे, शेळया, मेंढया घटसर्प, फऱ्या, पी.पी. आर, आंत्रविषार आदि साथीच्या रोगास बळी पडण्याची शक्यता वाढते. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी शेतकरी व पशुपालकांनी या साथीच्या रोगापासून जनावरे रोगमुक्त करुन राष्ट्रीय संपत्तीचे जतन करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. एस. भोसले यांनी केले आहे.

या साथीच्या रोगापासून बचाव करण्यासाठी संबंधितांनी पावसाळया्पूर्वी रोग प्रतिबंधक लसीकरण करुन घ्यावे. मागील काही वर्षापासून जिल्हयात जनावरांना मोठया प्रमाणात फऱ्या व घटसर्प आणि लाळखरकुत रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून आल्याने कोंबड्यांना मानमोडी, देवी, लासोटा आदि रोगाचे प्रतिबंधक लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे.

लसीकरणासाठी प्रतिजनावरांस नाममात्र एक रुपया सेवा शुल्क असून शेतकरी व पशुपालकांनी आपल्या नजीकच्या पशुवैद्यकिय दवाखान्यात जनावरांस लसीकरण करुन घ्यावे. केंद्र व राज्य शासन पुरस्कृत ॲस्कॅड व एफ एम डी सी पी आणि एनसीपी/ पीपीआर योजनेंअंतर्गत सदरील प्रतिबंधक लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे कळविण्यात आले आहे.
 
 
  संबंधित बातम्या
कारागृहात शेतकरी संघटनेचे आजपासून उपोषण
विकास कामासाठी राजकारण करु नये - दुधगावकर
नोकरीचे आमिष दाखवून गंडविले
उजनीच्या पाण्याचा मुक्काम लांबणार
दुष्काळग्रस्त जनतेच्या आडचणी सोडविण्यास कटीबध्द
आवळेंनीच लातूर,उस्मानाबादचा गळा आवळला
महिला कर्मचार्‍यांनी सांभाळली पोलिस ठाण्याची धुरा
राज्य माहिती आयुक्त दी.बा.देशपांडे उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर
पेन्शन अदालत रद्द
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा २२ मार्चला
विद्यार्थ्यांना करिअर निवडीसाठी समुपदेशनाची सुविधा
महिलांना संरक्षण देण्यास शासन कटिबध्द
अन्नधान्य वितरणाचे परिमाण
फळबाग व भाजीपाला पिक व्यवस्थापनासाठी जनजागृती
हवालदारास लाच घेताना रंगेहात पकडले
चोराखळी ग्रामस्थांकडून दुधगांवकरांचा सत्कार
उस्मानाबाद जि.प.मध्ये सावळा गोंधळ
लोकसहभागातून गाळ काढण्याच्या मोहिमेने घेतला वेग
बचत गटांना ९० टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर
चव्हाण यांच्या हस्ते महिला मेळाव्याचे उदघाटन
Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 - 40 Next
Records 241 to 260 of 5720
 
     
A Leading E-Newspaper from Osmanabad....
सर्व हक्क सुरक्षित. कॉपीराईट 2010. Powerd by :