
उस्मानाबाद : मानव कल्याण व वृक्ष संरक्षण संस्थेच्या जिल्हाध्यपदी उमरगा तालुक्यातील डाळींब येथील बेलेश्वर संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. अनंतराव पांचाळ महाराज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बाबतचे नियुक्तीपत्र संस्थेचे संस्थापक ह्नराष्ट्रीय अध्यक्ष रमेश घेगडे यांनी ह.भ.प. पांचाळ महाराज यांना प्रदान केले आहे.
या संस्थेचे कार्यक्षेत्र भारतभर आहे. झाडे लावा, झाडे जगवा. तुम्हीही जगा आणि त्यांनाही जगू द्या.जास्तीत जास्त वृक्षाची लागवड करुन वृक्षाचे संवर्धन करा हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
या नियुक्तीबद्दल ह.भ.प.पांचाळ महाराज यांचे विविध मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.
|