
उस्मानाबाद - उस्मानाबाद आणि कळंब तालुक्यातील १० वी आणि १२ वीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते रविवार,दि. ८ जुलै रोजी येथील जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे. यावेळी या विद्यार्थ्यांना आमदार राजेनिंबाळकर यांच्यावतीने लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार करुन घेतले जाणार आहे. या कार्यक्रमास ह.भ.प. संदीपान महाराज हसेगावकर आणि ह. भ.प.महादेव तांबे महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
विद्यार्थ्यांचा यावेळी स्मृतीचिन्ह, छोटेसे रोपटे देवूनही गौरव करण्यात येणार आहे.
लोकराज्य हे मासिक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रकाशित केले जाते त्याची वार्षिक वर्गणी फक्त १०० रुपये असून वर्गणीदार होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा. या मासिकामध्ये शासन निर्णय, विविध योजना, महाराष्ट्राची ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक माहिती प्रसिध्द करण्यात येते. विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्टया उपयुक्त व त्यांच्या सामान्य ज्ञानात भर घालणारी तसेच स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त माहिती यात समाविष्ट असते.
|