
उस्मानाबाद - महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी के.एम. नागरगोजे यांनी कै. नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. मावळते जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासह अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्ञानोबा फुलारी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी सर्वश्री के. ए. तडवी, मिनाज मुल्ला, शिल्पा करमरकर, जिल्हा नियोजन अधिकारी एम. के. भांगे, तहसीलदार अभिजीत पाटील व चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
|