
उस्मानाबाद शहर व जिल्ह्यात एप्रिल, मे मध्ये भीषण पाणीटंचाई होती.जिल्ह्यात अनेक गावात टँकरने पाणी पुरवठा चालू होता. हे टँकर सुरू करण्याचे अधिकार जिल्हाधिका-यांना आहेत.
उस्मानाबादेतही आठ दिवसांतून एकदा नळ पाणी पुरवठा चालू आहे.त्यामुळे अनेकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.या पाणी टंचाईची झळ दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी डॉ.प्रवीण गेडाम यांनाही बसली.त्यांच्या बंगल्यात कुपनलिका आहे, मात्र त्याचे पाणी कमी झाले आहे.नळाला तर आठ दिवसांतून एकदा पाणी येते.त्यांच्या घरात पाणी टंचाई आहे.मनात आणले असते तर ते दररोज टँकरने पाणी मागविले असते.मागील जिल्हाधिकारी पाणी टँचाईच्या काळात टँकर मागवत असत.मात्र डॉ.गेडाम यांनी कधीच टँकर न मागवता, आहे त्या पाण्याची बचत करून दिवस काढले.
ही काही काल्पनिक गोष्ट नाही तर सत्यता आहे.डॉ.गेडाम यांच्या मातोश्री लक्ष्मीकमल गेडाम या प्रसिध्द लेखिका व गीतकार आहेत.त्यांच्या निसर्ग हिंदोळा या गीताच्या सीडीच्या वेळी त्यांच्या घरी जाण्याची संधी मिळाली, तेव्हा ही अनुभूती आली.
आई लक्ष्मीकमल यांना पाणी टंचाईबाबत विचारले असता, त्यांनी याबाबत प्लीज पेपरात लिहू नका, असे आम्हाला बजावले होते.मात्र आम्हाला राहवत नाही, म्हणून ही वस्तुस्थिती लिहित आहे.यावरून स्पष्ट होते की, जिल्हाधिकारी डॉ.गेडाम किती आपल्या कामाशी प्रामाणिक होते.त्यांनी आपल्या पदाचा कधीच गैरवापर केला नाही.असा जिल्हाधिकारी उस्मानाबादला लाभला, हे उस्मानाबादकरांचे नशिबच समजावे लागेल.
* नव्या बंगल्याचे कामही थांबविले
उस्मानाबाच्या जिल्हाधिका-यांचा संध्याचा बंगला खूप पुरातण आहे.त्यामुळे आहे त्या बंगल्याजवळ नव्या बंगल्याचे काम गेल्या काही महिन्यापासून चालू आहे.मात्र पाणी टंचाईमुळे या बंगल्याचे काम काही महिन्यापुर्वी थांबविण्यात आले आहे.
हा या नव्या बंगल्यात पहिला प्रवेश डॉ.गेडाम यांचा होईल, असे वाटले होते,मात्र याचा हव्यास डॉ.गेडाम यांना नव्हता.अन्यथा टँकरने पाणी आणून या बंगल्याचे काम मागेच पुर्ण करता आले असते.
|