A Leading E-Newspaper from Osmanabad....
     
 
 
ताज्या बातम्या
 
 
शांतीचा संदेश देण्याची धमक फक्त भारतात - हुसेन
(Updated on 01/07/2012 11 : 30 IST)
 
शांतीचा संदेश देण्याची धमक फक्त भारतात - हुसेन उमरगा - जगाला शांतीचा संदेश देण्याची धमक फक्त भारतातच आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार पद्श्री मुझफ्फर हुसेन यांनी येथे व्यक्त केले.
उमरगा येथे छत्रपती शिवाजी महाविद्यालय व रोटरी क्लब उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ’ शांतीद्वारे सेवा’ या चर्चासत्रात ते बोलत होत़े कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ़ एऩ डी़ शिंदे, तर प्रमुख उपस्थितात संस्था सचिव पद्माकर हराळकर, संचालक सुरेश बिराजदार, डॉ़ दीपक पोफळे, डॉ़ अशोक अहंकारी, डॉ़ डी़ एस़ बिराजदार आदींची प्रमुख उपस्थिती होती़

पुढे बोलताना हुसेन यांनी भारतीय संस्कृतीचे महत्व विषद करताना शांतीचे धडे शिकविण्याची धमक भारतीय संस्कृतीत असल्याचे नमूद केल़े आपण कुठलेही शुभकार्य करताना दीप प्रज्वलन करतो़ यामागील भावना अंधारातून उजेडाकडे जाण्याची असत़े वाढदिवशी आरती ओवाळून जीवनातील अंधार दूर होऊन, पुढील जीवन प्रकाशमय होण्याची कामना केली जात़े हिरोशिमा व नागासाकीवर अणुबॉम्ब टाकणारा जनरल पायलट आपल्यामुळे नऊ लाख लोकांचा मृत्यू झाल्याने तो वेडा झाला़ त्याला शांती पाहिजे होती़ जगभर फिरूनही ती मिळाली नाही़ तो भारतात मुंबई येथील अंधेरी येथे आला़ तेथे भेटलेल्या एका साधूने त्यास गोरगरीब रुग्णांची सेवा कर, तुला शांती भेटेल, असे सांगितल़े याच प्रेरणेतून जनरल एशायर याने जगभरात ५० रुग्णालये उभारली़ मुंबईत अंधेरी येथील जनरल एशायर हॉस्पिटल त्यांनीच उभारले असून, या सर्व रुग्णालयांतून सर्वसामान्य रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे जगात भारतीय संस्कृती सर्वर्शेष्ठ असून, त्याचे जतन करण्याचे आवाहन केल़े यावेळी शहरातील नागरिक, विद्यार्थी, महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत़े
 
 
  संबंधित बातम्या
अंगावरची हळद सुकण्‍यापूर्वीच नवरदेवाचा दुर्दैवी मृत्‍यू
हजरत ख्वॉजा शमशोद्दीन गाजी रहे.यांच्या उरूसास प्रारंभ
रंगराजन समितीच्या सर्व शिफारशी लागू करा
दोन मुलीनंतर केली शस्त्रक्रिया
गाई - म्हैशीच्या दूध व विक्री खरेदी दरात वाढ
चारा छावण्यांसाठी ८ कोटी ५ लाख रुपये खर्च
शासकीय इमारतींवर होणार पाऊस पाणी संकलन
आरोपी संग्राम साळुंके यास तीन दिवस कोठडी
जनावरांना पावसाळयापुर्वी लसीकरण करण्याचे आवाहन
रब्बी हंगामातील २९३ गावे टंचाईग्रस्त जाहीर
जाधव, वैद्य यांची पत्रकार संघावर निवड
जिल्हा बँकेच्या मदतीचा ठराव
उस्मानाबादेत अनैतिक संबंधातून विवाहित तरूणीचा खून
जिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी कक्ष बंद
पाण्याच्या टाक्यांचा हिशोब जुळेना ...
येरमाळाजवळ अपघातात 5 ठार
उस्मानाबादेत धान्य महोत्सवास सुरुवात
खते,बियाणे आणि कर्जपुरवठ्याचे योग्य नियोजन व्हावे
पावसाळ्यातील संभाव्य अडचणींबाबत दक्षता घ्यावी-फुलारी
महात्मा बसवेश्वरांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 - 40 Next
Records 1 to 20 of 5728
 
     
A Leading E-Newspaper from Osmanabad....
सर्व हक्क सुरक्षित. कॉपीराईट 2010. Powerd by :