कोपर्डी प्रकरणानंतर पोलीस आणि राजकीय नेत्यांना जाग

 2016-07-25 8:42:57 |

उस्मानाबाद - कोपर्डी प्रकरणानंतर उस्मानाबादच्या पोलीसांना जाग आली असून,पोलीसांनी रोडरोमिओविरूध्द मोहीम उघडली आहे.दुसरीकडे उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीही याप्रकरणी पुढाकार घेतला असून,यावर विचारमंथन करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक,पालक आणि विद्यार्थीनी यांची बैठक ३१ जुलै(रविवार) रोजी आयोजित केली आहे.
कोपर्डी प्रकरणी उस्मानाबादेत सोमवार दि.१८ जुलै रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला.त्यानंतर जिल्ह्यात याच दिवशी व त्यानंतर सलग चार दिवस कुठे ना कुठे बंद पाळण्यात आला.त्याची दखल घेत उस्मानाबादच्या पोलीसांनी उस्मानाबाद,तुळजापूरसह अनेक ठिकाणी रोडरोमिओविरूध्द मोहीम उघडली आहे.शाळा - कॉलेज रस्त्यावर

Read More

कारगील युध्दातील शहिदांना अभिवादन

 2016-07-26 16:00:17 |

उस्मानाबाद - कारगील विजय दिनानिमित्त उस्मानाबाद नगरपरिषदेसमोरील हुतात्मा स्मृती स्तंभास जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले व कारगील युध्दात शहीद झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहिली.

या वेळी उस्मानाबाद नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संपतराव डोके, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते, कंमांडर जी. जी. सलोखे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी

Read More

राठोड यांचा सभापती पदाचा राजीनामा

 2016-07-19 18:58:06 |

नळदुर्ग - शहरवासियांना पाणीपुरवठा वेळेवर होवू शकला नाही. न.प. च्या ढिसाळ कारभारामुळे शहरवासियांच्या गैरसोयीबाबत नैतिक जबाबदारी स्विकारुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तथा पाणीपुरवठा समितीचे सभापती निरंजन देविदास राठोड यांनी आपल्या सभापती पदाचा राजीनामा मंगळवार दि. १९ जुलै रोजी नगराध्यक्षांकडे दिला.

नगरसेवक निरंजन राठोड यांनी राजीनामा पत्रात पुढे नमूद केले की, पाणीपुरवठा सभापती पदाचा पदभार घेतल्यापासून पाणीपुरवठा

Read More

नवविवाहित महिलेची आत्महत्त्या

 2016-07-09 20:18:17 |

कळंब - धंदा करण्यासाठी पैसे आण म्हणजे छळ केल्यामुळे हासेगाव (के) येथील नवविवाहित महिलेने राहत्या घरातील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली असुन या प्रकरणी तीघा विरुध्द कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
निशा लगसकर(वय १९) हीचा विविध हासेगाव (के) येथील जयहरी चौरे यांच्यासोबत झाला होता. निशा हीला तु धंदा करण्यासाठी माहेरवरुन

Read More

तुमची आमची एकच जात, दोन पाय दोन हात !

 2016-06-29 13:39:23 |

छत्रपती शाहू महाराजांचा विजय असोः महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असोः डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असोः वेळ

Read More

संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे परंडा नगरीत उत्साहात स्वागत

 2016-07-08 18:45:13 |

परंडा - पैठण येथून पंढरपूरकडे आषाढीवारीसाठी निघालेल्या संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे हे ४१९ वे वर्ष असून या पालखीचे परंडा नगरीत दि. ८ जुलै (शुक्रवार) रोजी सायंकाळी ६ वाजता आगमन झाले.
सालाबादप्रमणे पैठणहूण निघालेल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे शहरामध्ये मोठ्या उत्साहात स्वागत केले, ठिक-ठिकाणी वारक-यांसाठी चाहा -पाणी आणि फराळाची सोय

Read More